Sarva Pitru Amavasya 2025 Date And Time: भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्वपित्री दर्श अमावस्या असेही म्हणतात. सर्व पितरांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस समर्पित केला जातो. ज्या लोकांना त्यांच्या पितरांची तिथी माहिती नसेल किंवा कळतनकळत श्राद्ध कार्य करणे शक्य झाले नसेल, ती मंडळी सर्वपित्री अमावस्येदिवशी विधीवत कार्य करू शकतात. पितृपक्षामध्ये पृथ्वीवर येणाऱ्या पितरांचे श्राद्ध, तर्पण इत्यादी विधी पूर्ण केल्यानंतर त्यांना आदरपूर्वक निरोप दिला जातो. श्रद्धापूर्वक श्राद्ध केले तर पितरांचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी केली जाणारी पूजा आणि त्याचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया...
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी काय करावे? (PtSarva Pitru Amavasya Dos And Don'ts)
स्नान आणि स्वच्छता
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नानध्यान करावे. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे.
स्नान केल्यानंतर पितरांसाठी तर्पण करावे
तर्पण म्हणजे पाण्याच्या माध्यमातून पितरांना श्रद्धांजली वाहणे. स्नान केल्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी घ्या. तांब्यामध्ये जवस, काळे तीळ आणि गवत ठेवून पितरांना पाणी अर्पण करावे. पितरांना पाणी अर्पण करताना तुमचे मुख दक्षिण दिशेकडे असावे. पाणी अर्पण करताना "ॐ पितृभ्यः स्वधा" या मंत्रा म्हणावा. तर्पण मनोभावे करावे.
Photo Credit: PTI
पितरांसाठी पिंडदान कसे करावे?
पितरांसाठी पिंडदान करणं शक्य असल्यास एखाद्या पुरोहितांच्या मदतीने ते करावे. पिंडदानासाठी तांदूळ, जवस, तीळ आणि गाईचे तूप एकत्रित करुन पिंड तयार करावे. स्वच्छ ठिकाणी पिंड पानावर किंवा थाळीमध्ये ठेवा आणि पितरांचे स्मरण करुन त्यांना अर्पण करा. पिंडदानामुळे पितरांना समाधान मिळते आणि त्यांचा आशीर्वादही मिळतो, असे म्हणतात.
पंचबलीचे नियम
पितरांव्यतिरिक्त पृथ्वीवरील काही जीवांनाही भोजन द्यावे. जेवणाची एक वाडी गाय, श्वान, कावळा, मुंगी आणि देवतांसाठीही काढून ठेवावी. ही अतिशय जुनी परंपरा आहे आणि सर्व सजीवांना भोजन देणे हा त्यामागील उद्देश आहे.
ब्राह्मण भोजन आणि दान
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन देणे मोठे पुण्याचे कार्य मानले जाते. शक्य असल्यास एक, तीन किंवा पाच ब्राह्मणांना आमंत्रित करावे. यासाठी श्राद्धापूर्वीच ब्राह्मणांना आमंत्रण द्यावे. ब्राह्मणांना भोजन देण्यापूर्वी पितरांसाठीचे भोजन काढून ठेवावे. जेवणानंतर ब्राह्मणाला कपडे, अन्न किंवा जे काही शक्य असेल ते दान करावे.
Photo Credit: PTI
पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करावा
सर्वपित्री अमावस्येच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ चौमुखी दिवा प्रज्वलित करावे. हा दिवा पितरांच्या मार्गदर्शनाचे प्रतीक आहे. दिवा प्रज्वलित करताना "ॐ सर्व पितृ देवताभ्यो नमः" या मंत्रांचा जप करावा आणि तुमच्या पितरांच्या सुख-शांतीसाठी प्रार्थना करावी.
(नक्की वाचा: Surya Grahan 2025: सूर्यग्रहण कधी, 21 की 22 सप्टेंबर? जगभरासह 12 राशींवर काय होतील परिणाम? जाणून घ्या उपाय)
पितरांना आदरपूर्वक निरोप द्यावा
दिवा प्रज्वलित केल्यानंतर मनामध्ये आपल्या पितरांना पितृलोकमध्ये जाण्यास प्रार्थना करावी. पितृपक्षामध्ये केलेल्या श्राद्ध, तर्पण इत्यादी कार्यांमध्ये कळतनकळत चूक झाली असल्यास त्याबाबत माफी मागावी आणि स्वतःच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागावा. आपल्या कुटुंबावर कायम कृपादृष्टी ठेवावी, अशीही प्रार्थना पितरांना करावी. हा एक भावनिक क्षण असतो, यामुळे कुटुंब आणि पितरांमधील नाते मजबूत होण्यास मदत मिळते, असे म्हणतात.
दानाचे महत्त्व
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी दानधर्म करणे अतिशय शुभ मानले जाते. ब्राह्मणांना किंवा गरजवंतांना वस्त्र, भोजन, फळं, मिठाई, भांडी इत्यादी गोष्टी दान करावे. यामुळे पितरांना समाधान मिळते आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदते, असेही म्हणतात.
सर्वपित्री अमावस्येला करा हे छोटे पण प्रभावी उपाय(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)