
Surya Grahan 2025 Date And Time: पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने झाली तर समाप्ती सूर्यग्रहणाने होणार आहे. यंदाच्या वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण 21 की 22 सप्टेंबर, नेमके कधी आहे? भारतामध्ये ग्रहण कधी दिसणार आहे आणि सूतक काळ कधी आहे? सूर्यग्रहणामुळे जगभरासह तुमच्या राशीवर कसा परिणाम होईल? याबाबत प्रसिद्ध ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ डॉ. नीती शर्मा यांनी सविस्तर सांगितलेली माहिती जाणून घेऊया...
सूर्यग्रहण म्हणजे नेमके काय? (What Is Solar Eclipse 2025)
जेव्हा चंद्र सूर्य - पृथ्वीच्या मधोमध येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीमुळे पृथ्वीवरील काही भागांमध्ये सूर्य दिसेनासा होतो, यास सूर्यग्रहण (Surya Grahan 2025) असे म्हणतात.
ग्रहणाचे मुख्य प्रकार
- खग्रास (पूर्ण) सूर्यग्रहण
- खंडग्रास (आंशिक) सूर्यग्रहण
- कंकणाकृती सूर्यग्रहण
सूर्यग्रहण कधी आहे आणि कालावधी काय आहे? (Surya Grahan 2025 Timing)
- 21 सप्टेंबर 2025 रोजी सूर्यग्रहण आहे.
- Surya Grahan 2025 Start Time: आंशिक ग्रहण सुरू होण्याची वेळ: संध्याकाळी 5:29 UTC → भारतात रात्री 10:59 वाजता ग्रहणास सुरुवात होईल.
- Surya Grahan 2025 End Time: भारतात 22 सप्टेंबर रोजी पहाटे 3:23 वाजता सूर्यग्रहण समाप्त होईल.

सूर्य ग्रहणाचा 12 राशींवरील परिणाम आणि उपाय (Solar Eclipse Impact On 12 Zodiac Sign)
1. मेष रास | Aries Zodiac Sign
परिणाम: मानसिक तणाव, घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे नुकसान होण्याची शक्यता
उपाय: हनुमान चालीसाचे पठण, गूळचणे दान करणे.
2. वृषभ रास | Taurus Zodiac Sign
परिणाम: पैशाचे नुकसान आणि अनावश्यक खर्च
उपाय: देवी लक्ष्मीची पूजा करावी, पांढऱ्या रंगाचे वस्त्र किंवा तांदूळ दान करावे.
3. मिथुन रास | Gemini Zodiac Sign
परिणाम: वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात.
उपाय: तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे, शुक्ल मंत्राचा जप करावा.
4. कर्क रास | Cancer Zodiac Sign
परिणाम: आरोग्याशी संबंधित अडचणी.
उपाय: दुधामध्ये केसर मिक्स करुन शिवलिंगावर अभिषेक करावा.
5. सिंह रास | Leo Zodiac Sign
परिणाम: संतान आणि शिक्षणामध्ये अडथळे.
उपाय: सूर्याला अर्घ्य करावे, गहू दान करावे.
6. कन्या रास | Virgo Zodiac Sign
परिणाम: कुटुंबामध्ये मतभेद होण्याची शक्यता
उपाय: दुर्गा सप्तशती पठण करा आणि हिरवे मूग दान करा.

7. तूळ रास | Libra Zodiac Sign
परिणाम: प्रवासात अडथळे येण्याची शक्यता.
उपाय: सरस्वती देवीची पूजा करा आणि गोड पदार्थांचे वाटप करावे.
8. वृश्चिक रास | Scorpio Zodiac Sign
परिणाम: आर्थिक ताण, गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा.
उपाय: रुद्राभिषेक करा आणि काळे तीळ दान करा.
9. धनु रास | Sagittarius Zodiac Sign
परिणाम: आत्मविश्वास कमी होईल, कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता.
उपाय: विष्णु सहस्रनाम पठण आणि पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे.
10. मकर रास | Capricorn Zodiac Sign
परिणाम: मालमत्तेशी संबंधित वाद निर्माण होण्याची शक्यता.
उपाय: शनि मंत्र जप करावा आणि उडद दान करावे.
(नक्की वाचा: Solar Eclipse 2025: एक दिवस आधीच 'Google' वर सूर्यग्रहण! स्क्रीनवर दिसतेय कमाल जादू; तुम्हीही करुन पाहा)
11. कुंभ रास | Aquarius Zodiac Sign
परिणाम: मित्रांमध्ये मतभेद आणि मानसिकरित्या अस्वस्थता जाणवू शकते.
उपाय: राहू-केतूच्या शांतीसाठी नारळ प्रवाहित करावा.
12. मीन रास | Pisces Zodiac Sign
परिणाम: खर्च अधिक होण्याची शक्यता आणि धनाची कमतरता भासू शकते.
उपाय: भगवान शिवशंकराला पाण्यामध्ये मिक्स केलेले तांदूळ अर्पण करा.
NOTE: भारतामध्ये ग्रहण दिसणार नाही, पण जगाच्या सामूहिक ऊर्जेवर याचा परिणाम निश्चितच होईल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world