Garba History : गरब्याची सुरुवात कशी आणि केव्हा झाली? स्त्रियांच्या प्रजननक्षमतेशी कसा आहे संबंध? वाचा इतिहास

आपल्यापैकी अनेकांना गरबा आवडतो. दरवर्षी आपण भान हरपून गरबा खेळतो. मात्र खूप कमी जणांना यामागील इतिहास माहिती असतो. आज नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला गरब्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत. 

जाहिरात
Read Time: 3 mins

Garba History : देशभरात नवरात्रौत्सवाचा आनंद आहे. घराघरांमध्ये देवीची पूजा-अर्चा केली जात आहे. आज घटस्थापनेच्या दिवशी अनेक घरांमध्ये देवीच्या घटाची स्थापना केली जाते आणि पुढील नऊ दिवस मनोभावे त्याची पूजा केली जाते. अनेकजण नऊ दिवस उपवासही करतात. आणि रात्री आईचा जागर करीत गरबा-दांडिया खेळतात. खरं पाहता नवरात्र नाव घेताच पहिला मनात येणारा विचार म्हणजे गरबा आणि दांडिया. (origin of garba)

आपल्यापैकी अनेकांना गरबा आवडतो. दरवर्षी आपण भान हरपून गरबा खेळतो. मात्र खूप कमी जणांना यामागील इतिहास माहिती असतो. आज नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला गरब्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत. 

गरबा काय आहे? (what is Garba) 

गरबा हा लोकनृत्याचा प्रकार आहे. याचा उगम गुजरात या राज्यात झाला. हा केवळ धार्मिकच नाही तर सामाजिकही कार्यक्रम आहे. गुजरात राज्यातील खेड्यांमधून गरब्याची सुरुवात झाली. आधीच्या काळात या गावांमधील सार्वजनिक मेळाव्यात गरबा सादर केला जात होता. गरबा हा जगातील सर्वात मोठा आणि लांब नृत्योत्सव मानला जातो. 

नवरात्रीचं महत्त्व (Importance of Garba)

नवरात्रौत्सवात नऊ दिवस भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते. गुजरातमध्ये नवरात्रौत्सवात भक्ती आणि उपासनेचा एक भाग म्हणून नऊ रात्री गरबा खेळला जातो. गुजरातमध्ये सहा महिन्यांपूर्वीपासून गरब्याचे विषेश क्लासेसही सुरू होतात. गुजरातमध्ये गरबा आणि दांडियाचं खास आकर्षण असतं. येथे तर नवरात्रौत्सवाव्यतिरिक्तही अनेक कार्यक्रमांमध्येही गरबा खेळला जातो. 

Advertisement

गरबा हा स्त्रीत्वाचा उत्सव...

सर्वसाधारणपणे गरब्याला आनंद आणि उत्सवाशी जोडलं जातं. मात्र त्याचा खरा अर्थ वेगळा आहे. गरबा ज्याला गरबो असंही म्हटलं जातं. तो प्रजनन क्षमतेशी जोडलेला आहे. गरबा हा स्त्रीत्वाचा सन्मान करणारा लोकनृत्याचा प्रकार आहे. गरबा या नृत्य प्रकाराच्या नावाबद्दल सांगायचं झाल्यास 'गरबा' हा शब्द संस्कृत शब्द 'गर्भ' यापासून घेण्यात आला आहे.  

गरब्याची सुरुवात कशी झाली? (origin of garba dance)

गुजरातमध्ये या नृत्याचं एक वेगळचं महत्त्व आहे. पारंपरिकपणे मुलीच्या पहिल्या मासिक पाळीच्या वेळी आणि तिच्या लग्नाला गरबा सादर केला जातो. नवरात्रौत्सवातही गरबा खेळला जातो. काही पुराणांमध्ये गरबा आणि तत्सम नृत्यांचा उल्लेख आहे. हरिवंश पुराणात गुजरातमधील यादवांनी सादर केलेल्यांपैकी दंड रसक आणि ताल रसक या दोन लोकप्रिय नृत्यांचा उल्लेख आहे. हरिवंश पुराणातील दुसऱ्या एका अध्यायात आणखी एका नृत्याचा उल्लेख आहे, ज्यामध्ये महिला टाळ्या वाजवतात आणि नाच करतात. ही नृत्यशैली सोलंकी (942-1022 इ.स.) आणि वाघेला राजवंश (1244-1304 इ.स.) यांच्या कारकिर्दीत विकसित झाली असं मानलं जातं. 

Advertisement

गरब्याची आख्यायिका काय आहे? 

गरब्याच्या उत्पत्तीशी संबंधिक एक पौराणिक कथा देखील आहे. 

राक्षसांचा राजा महिषासुराला भगवान ब्रम्हदेवाकडून वरदान मिळालं होतं. महिषासुराला अमरत्वाचं वरदान मिळालं होतं. मात्र हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने तिन्ही लोकांमध्ये कहर केला. अमरत्वाचं वरदान असल्यामुळे देवही त्याचा पराभूत करू शकत नव्हते. महिषासुराच्या त्रासातून देवांनी भगवान विष्णूकडे मदतीसाठी धाव घेतली. महिषासुराला थांबविण्यासाठी काय करायला हवं यातून ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या शक्तीने दुर्गेचं रुप घेतलं. देवीच्या जन्मामंतर देवीने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध केलं. दुर्गेने त्याचा वध केला आणि सर्वांची सुटका केली. गरबा हा जगात शांतता आणण्यासाठी देवीच्या चिकाटी आणि कठोर परिश्रमाबद्दल आभार मानन्यासाठी खेळला जातो. 

Advertisement

नक्की वाचा - Navratri 2025 Colours And Their Significance: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, प्रत्येक रंगाचे महत्त्व जाणून घ्या

गरबा कसा खेळला जातो? 

गरबा खेळण्याची एक विशिष्ट वेगळी अशी पद्धत आहे. पुरुष आणि महिला एकत्र येत वर्तुळ तयार करतात. हे वर्तुळ जन्मापासून पूनर्जन्मापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यातील जीवनचक्राचं प्रतीक मानलं जातं. देवीची प्रतीमा वर्तुळाच्या मध्यभागी ठेवली जाते. त्यासमोर एक खोल मातीचा दिवा लावला जातो. हे नृत्य राक्षस राजा आणि देवी यांच्यातील युद्धाचं चित्रण करतं. अनेक ठिकाणी दांडिया खेळला जातो. यासाठी दोन काठ्यांचा वापर केला जातो. या काठ्या म्हणजे युद्धादरम्यान देवीने वापरलेल्या तलवारीचं प्रतीक आहे. 

गरब्यासाठी पारंपरिक पोशाख

गरब्यादरम्यान महिला आणि पुरुख पारंपरिक पोशाख परिधान करतात. महिला रंगीबेरंगी चनिया चोली घालतात. कमरबंद, हार, अंगठ्या, पैंजण असे आभूषणं घातली जातात. तर पुरुष केविया आणि चुडीदार घालतात.केविया हा एक लांब बाह्यांचा टॉपसारखपोशाख आहे. ज्यावर शिवलेला कोट आणि रंगीत काम असतं.