
Navratri 2025 Colours And Significance: शारदीय नवरात्रौत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जातो. यंदा 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीचा सण साजरा केला जाणार आहे. भाविक वाजतगाजत घरांमध्ये तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांमध्ये देवीमातेचे स्वागत करतात आणि तिची मनोभावे सेवाही करतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांत नऊ रंगांचंही विशेष महत्त्व आहे. यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग (Navratri Colors For 9 Days 2025) आहे आणि त्या रंगाचे वैशिष्ट्य काय आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
नवरात्रीच्या 9 दिवसांचे नऊ रंग आणि त्यांचे महत्त्व | Significance Of Navratri 9 Colors
22 सप्टेंबर 2025 , सोमवार, पांढरा रंग
- नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते.
- पांढरा रंग हा निरागसता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो.

Photo Credit: Parna Pethe Instagram
23 सप्टेंबर 2025, मंगळवार, लाल रंग
- दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते.
- लाल रंग ऊर्जा, धाडस आणि भक्तीचे प्रतीक मानला जातो.

Photo Credit: Mithila Palkar Instagram
24 सप्टेंबर 2025, बुधवार, निळा रंग | Navratri Colors 2025 List
- नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते.
- निळा रंग हा शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

Photo Credit: Prajakta Mali Instagram
25 सप्टेंबर 2025, गुरुवार, पिवळा रंग
- नवरात्रीचा चौथा दिवस कुष्मांडा मातेसाठी समर्पित केला जातो.
- पिवळा रंग बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे.

Photo Credit: Rinku Rajguru
26 सप्टेंबर 2025, शुक्रवार, हिरवा रंग
- नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता मातेची पूजा केली जाते.
- हिरवा रंग आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या रंगाचे कपडे परिधान केल्यास कुटुंबात शांतता, आनंद, सकारात्मक निर्माण होते, असे म्हणतात.

Photo Credit: Tejaswini Pandit Instagram
27 सप्टेंबर 2025, शनिवार, राखाडी रंग
- नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केली जाते.
- राखाडी रंग भावानांमधील संतुलन दर्शवतो.

Photo Credit: Spruha Joshi Instagram
(नक्की वाचा: Shardiya Navratri 2025: नवरात्रीत घटस्थापना कशी करावी? शुभ मुहूर्त, पूजा विधी, पूजा सामग्री, 9 रंग जाणून घ्या एका क्लिकवर)
28 सप्टेंबर 2025, रविवार, केशरी रंग
- नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री मातेची पूजा केली जाते.
- केशरी रंग उत्साह, धैर्य आणि प्रेरणेचे प्रतीक आहे.

Photo Credit: Vaidehi Parashurami Instagram
29 सप्टेंबर 2025, सोमवार, मोरपंखी रंग
- नवरात्रीचा आठवा दिवस महागौरी मातेस समर्पित आहे.
- मोरपंखी रंग हा अद्वितीय व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहे.

Photo Credit: Canva AI
(नक्की वाचा: Navratri 2025 Fasting Rules: नवरात्रीचे व्रत कसे करावे? 9 दिवस काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम)
30 सप्टेंबर 2025, मंगळवार, गुलाबी रंग
- नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाते.
- गुलाबी रंग आपुलकी, प्रेम आणि ऐक्याचे प्रतीक आहे.

Photo Credit: Pooja Sawant Instagram
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world