Shingada Fruit : बाजारात शिंगाडे दिसले म्हणून लगेच खाऊ नका; कुणासाठी शिंगाडा त्रासदायक, जाणून घ्या!

पौष्टिक असले तरीही सर्वजण शिंगाडा खाऊ शकत नाही. 

जाहिरात
Read Time: 2 mins
shingada fruit

Who Should Avoid Water Chestnut : शिंगाड्याला इंग्रजीत वॉटर चेस्‍टनट (Water Chestnut) म्हटलं जातं. आशियात या पदार्थाला खूप पसंती असते. विशेषत: हिवाळ्यात हा पदार्थ सर्रास मार्केटमध्ये पाहायला मिळतो. शिंगाड्याचा उपयोग फ्राय, करी, सॅलेडसह अन्य पदार्थांमध्ये करू शकतो. यामध्ये फायबर, विटॅमिन आणि अँटीऑक्सिडेंटसारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. मात्र पौष्टिक असलं तरीही सर्वजण शिंगाडा खाऊ शकत नाही. 

Singhara Side Effects: काही जणांनी शिंगाडा खाताना काळजी घ्यायला हवी. विशेषत: मधुमेही, किडनी, पोटाचे आजार, एलर्जी असलेल्यांनी आणि रक्त पातळ होण्याचं औषध घेणाऱ्यांनी शिंगाडा खाताना अलर्ट राहणं आवश्यक आहे. 

शिंगाडा हे फळ पाण्यात उगवते. दलदलीच्या प्रदेशात, उथळ तलावांमध्ये, भातशेतींमध्ये शिंगाडा आढळतो. आग्नेय आशिया, चीन, तैवान, ऑस्ट्रेलिया आणि इंडो-पॅसिफिक महासागरातील बेटांवर याचं मूळ आहे. जेव्हा त्याचे कंद (कॉर्म्स) गडद तपकिरी होतात तेव्हा त्याची कापणी केली जाते.

Advertisement

नक्की वाचा - Mobile Use : तुमच्या उशीखालीच मृत्यू लपलाय, वेळीच सावध व्हा; नाहीतर जीवाला धोका!

शिंगाडा खाताना काळजी घ्या... Who Should Avoid Water Chestnut: 

  • तसं पाहता शिंगाडा सुरक्षित मानला जातो. मात्र यामुळे काहींना एलर्जी होऊ शकते. यामध्ये खाज, त्वचेवर व्रण, श्वास घेण्यास अडथळा सारखा गंभीर परिणाम दिसू शकतो. 
  • शिंगाड्यात कार्बोहायड्रेट असतं, ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. यामुळे रक्तातील साखर लवकर वाढते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर शिंगाडा कमी प्रमाणात खावा. यासोबत कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ खावेत, ज्यामुळे तुमची ग्लुकोजची पातळी स्थिर राहील. 
  • किडनी किंवा हृदयाच्या समस्या असणाऱ्यांनी शिंगाडा कमी प्रमाणात खावा. शिंगाड्यात सोडियमचं प्रमाण जास्त असतं. किडनीची समस्या, उच्च रक्तदाब किंवा हृदयासंबंधित आजार असलेल्यांनी अधिक काळजी घ्यावी. कारण सोडियममुळे शरीरात पाणी साचून राहतं आणि यामुळे रक्तदाब वाढू शकतो 
  • शिंगाड्यात फायबर असतं, जे पोटासाठी चांगलं आहे. मात्र काहींना यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो. इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) किंवा पोटाच्या इतर समस्या असलेल्या लोकांना शिंगाडा खाल्ल्यानंतर गॅस, पोटफुगी किंवा सौम्य पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. 
  • शिंगाड्यात विटॅमिनचं केचं प्रमाण मुबलक असतं. रक्त गोठण्यासाठी ते आवश्यक आहे. जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर शिंगाडा संतुलित प्रमाणात खावा. 

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.