Shirdi Sai Baba: साईबाबांचे 11 महामंत्र जे तुमचं पूर्ण आयुष्य बदलतील, अपार शक्ती मिळेल आणि दुःखांचा होईल अंत

Sai Baba 11 Vachan: शिर्डीच्या साईबाबांचे 11अनमोल वचन (Saibaba 11 Vachan) भक्तांसाठी एखाद्या महामंत्रासारखे आहेत. श्रद्धा आणि सबुरीचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या या 11 वचनांचे अर्थ आणि त्यांचा महिमा सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Sai Baba: शिर्डीच्या साईबाबांचे 11 अनमोल वचन"
Canva

Sai Baba 11 Vachan: शिर्डीच्या साईबाबांचे भक्त तुम्हाला देशभरात पाहायला मिळतील. श्रद्धा, सबुरी आणि मानवतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या साईबाबांना कोणी आपला गुरू तर कोणी आपला देव मानतो. लाखो-कोट्यवधी लोकांच्या आस्थेचे केंद्र बनलेल्या साईबाबांच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, आज संपूर्ण भारतात त्यांची छोटी-मोठी साई मंदिरे पाहायला मिळतात. जर त्यांच्या मुख्य स्थानाबाबत म्हणजेच शिर्डीबाबत बोलायचे झाले, तर येथे दररोज हजारोच्या संख्येने भाविक दर्शनसाठी पोहोचतात. श्रद्धा आणि विश्वासाचे केंद्र असलेल्या साईबाबांचे 11 वचन जाणून घेऊया, जे भाविकांसाठी महामंत्र बनले आहेत.

साईबाबांचे 11 अनमोल वचन| Shirdi Saibaba 11 Vachan

1. पहिले वचन:

"जो शिरडी में आएगा, आपद दूर भगाएगा"
अर्थ: जो कोणी भक्त माझ्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून शिर्डीला येईल, त्याचे सर्व दुःख आणि संकटे दूर होतील.

2. दुसरे वचन:

"चढ़े समाधि की सीढ़ी पर, पैर तले दुख की पीढ़ी पर"
अर्थ: बाबांच्या दरबारात पोहोचून केवळ दर्शन घेतल्यानेच व्यक्तीच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील.

3. तिसरे वचन:

"त्याग शरीर चला जाऊंगा, भक्त हेतु दौड़ा आऊंगा"
अर्थ: जरी आज साईबाबा शरीराने उपस्थित नसले, तरी ते आपल्या भक्ताच्या करुण हाकेला ओ देऊन त्याच्या मदतीसाठी धावून येतील.

(नक्की वाचा : Bath Types: स्नानाचे प्रकार किती? तुम्हीही राक्षसी स्नान करताय? स्नानानंतर ही 4 कामं करताय मग, होईल मोठा तोटा)

Advertisement

4. चौथे वचन:

"मन में रखना दृढ़ विश्वास, करे समाधि पूरी आस"
अर्थ: जर कोणत्याही भक्ताच्या मनात बाबांबाबत थोडी जरी श्रद्धा आणि विश्वास असेल तर निश्चितपणे बाबा त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.

5. पाचवे वचन:

"मुझे सदा जीवित ही जानो, अनुभव करो सत्य पहचानो"
अर्थ: या वचनाद्वारे साई आपल्या भक्तांना हा विश्वास देऊ इच्छितात की ते अप्रत्यक्षपणे त्यांच्यामध्येच आहेत म्हणूनच त्यांना नेहमी आपल्यात जिवंतच मानावे.

6. सहावे वचन:

"मेरी शरण आ खाली जाए, हो तो कोई मुझे बताए"
अर्थ: आपल्या या वचनाद्वारे साईबाबा हे आश्वासन देतात कि त्यांच्या शरण आलेला कोणताही भक्त कधीही रिकाम्या हाताने परत जाणार नाही.

7. सातवे वचन:

"जैसा भाव रहा जिस जन का, वैसा रूप हुआ मेरे मन का"
अर्थ: ज्या व्यक्तीने ज्या भावाने त्यांना पाहिले आणि पूजले, ते (साईबाबा) त्याच रूपात त्याला दर्शन देतात.

8. आठवे वचन:

"भार तुम्हारा मुझ पर होगा, वचन न मेरा झूठा होगा"
अर्थ: जर एखादा भक्त त्यांच्या दरबारात जातो, तर त्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल आणि त्यांनी दिलेले कोणतेही वचन कधीही खोटे ठरणार नाही.

9. नववे वचन:

"आ सहायता लो भरपूर, जो मांगा वो नहीं है दूर"
अर्थ: लोकांच्या मदतीसाठी त्यांचा दरबार नेहमी खुला आहे आणि तिथे प्रत्येक भक्ताने मागितलेली इच्छा पूर्ण होण्यास आता अजिबात वेळ लागणार नाही.

10. दहावे वचन:

"मुझमें लीन वचन मन काया, उसका ऋण न कभी चुकाया"
अर्थ: जो भक्त आपल्या वचनाने, मनाने आणि शरीराने त्यांच्या भक्तीत पूर्णपणे लीन आहे, ते कायम त्याचे आभारी राहतील. 

11. अकरावे वचन:

"धन्य धन्य व भक्त अनन्य, मेरी शरण तज जिसे न अन्य"
अर्थ: जे भक्त त्यांच्या भक्तीत पूर्णपणे बुडून गेले आहेत आणि ज्यांना त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही आधार नाही, ते भक्त धन्य आहेत.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)