Most Harmful New Years Drinks : थर्टी फर्स्टनंतर नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार करण्यासाठी अनेकांनी नवनवीन संकल्प केले आहेत. पण थर्टी फर्स्टला हँगओव्हर झालेल्या लोकांनी दारूच्या नशेतच नवीन वर्षाचं स्वागत केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. लोकांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह पार्टी, दारूच्या पेगने नवीन वर्षाचं स्वागत केल्याचंही म्हटलं जात आहे. पण लोकांचा हा अतिउत्साह त्यांच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतो. पार्टीत सेवन केल्या जाणाऱ्या अशा काही ड्रिंक्स आहेत, ज्या खूप टेस्टी तर असतात पण आरोग्यासाठी खूप घातक ठरतात.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, न्यू ईअर पार्टीमध्ये लोक गरजेपेक्षा जास्त मद्यपान करतात. शुगर आणि केमिकल्स मोठ्या प्रमाणात असलेल्या ड्रिंक्सचं सेवन करतात. यामुळे लोक फक्त हँगओव्हरच होत नाहीत, तर त्याचा वाईट परिणाम लिव्हर, हॉर्ट, पचनक्रिया आणि झोपेवर होतो. अनेक लोकांना वाटतं की,थर्टी फर्स्टच्या दिवशी दारूचं खूप व्यसन केलं पाहिजे. पण त्याचा खूपच घातक परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो, याचा ते जराही विचार करत नाहीत. त्यामुळे 2026 चं सेलीब्रेशन करताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचं आहे. म्हणजेच कोणत्या ड्रिंक्स सर्वात जास्त घातक आहे, ज्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. त्या 5 ड्रिंक्स कोणत्या आहेत, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
1) हाय-शुगर कॉकटेल
नववर्षाच्या पार्टीत रंगीबेरंगी कॉकटेल्स सर्वाधिक लोकप्रिय असतात.यात दारूसोबत फ्लेवर्ड सिरप, सॉफ्ट ड्रिंक आणि कृत्रिम ज्यूस मिक्स केले जातात.या ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. डॉक्टरांच्या माहितीनुसार, जास्त साखर आणि अल्कोहोलच्या सेवनामुळे लठ्ठपणा,मधुमेह आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.
नक्की वाचा >> RBI चा सर्वात मोठा निर्णय! प्रत्येक आठवड्याला अपडेट होणार Credit Score, कर्ज आणि क्रेडिट कार्ड असणाऱ्यांनी..
2) एनर्जी ड्रिंकसोबत दारू
आजकाल अनेक तरुण दारूमध्ये एनर्जी ड्रिंक मिक्स करून पितात,जेणेकरून ते पार्टी जास्त वेळ एन्जॉय करू शकतील.पण डॉक्टर हे सर्वात धोकादायक कॉम्बिनेशन मानतात.एनर्जी ड्रिंक हृदयाची धडधड वाढवते आणि दारूचा त्याच्यावर वाईट परिणाम होतो.हँगओव्हरमुळे त्या व्यक्तीला कळतच नाही की, त्याने दारूचं किती सेवन केलं आहे. यामुळे हृदयविकार,रक्तदाबाचा धोका वाढतो.
3) बिअरचं जास्त प्रमाणात सेवन
बिअर प्यायल्याने फार नुकसान होत नाही, असा लोकांचा समज आहे. पण बिअरचं सेवन केल्यावरही शरीरावर दुष्परिणाम होतात.बिअरमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात,ज्यामुळे वजन झपाट्याने वाढते.तसच बिअरचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोट फुगणे,शरीरात पाणी कमी होणे आणि झोपेच्या समस्याही निर्माण होतात.
नक्की वाचा >> 15 आठवड्यांत केलं 22 किलो वजन कमी, घरीच बनवा 'ही' Fat Loss सुपर ड्रिंक, फिटनेस ट्रेनरने शेअर केला व्हिडीओ
4) शॉट्स (एकापाठोपाठ एक)
पार्टीत शॉट्स घेण्याचा ट्रेंडही खूप सामान्य आहे. लोक एकामागोमाग स्ट्रॉंग दारूचे शॉट्स घेतात,ज्यामुळे अल्कोहोल थेट आणि झपाट्याने शरीरात जातो. डॉक्टर सांगतात की,यामुळे लिव्हरवर अचानक खूप ताण येतो. त्यामुळे उलटी,चक्कर,ब्लॅकआउट आणि अल्कोहोल पॉइझनिंगचा धोका निर्माण होतो.
5) खूप गोड मॉकटेल आणि पॅकेज्ड ड्रिंक्स
जे लोक दारू पित नाहीत,ते अनेकदा मॉकटेल किंवा पॅकेज्ड ड्रिंक्स घेतात.पण हेही पूर्णपणे सुरक्षित नसतात. यात कृत्रिम फ्लेवर,रंग आणि खूप साखर असते.डॉक्टर सांगतात की हे ड्रिंक्स पचन बिघडवू शकतात आणि दुसऱ्या दिवशी डोकेदुखी व थकवा आणू शकतात.
डॉक्टर काय सल्ला देतात?
डॉक्टरांच्या माहितीनुसार, नववर्षाच्या पार्टीत ड्रिंक्स मर्यादित प्रमाणात घ्या. दारू पित असाल तर पाण्यासोबत घ्या. रिकाम्या पोटी अजिबात पिऊ नका आणि गोड ड्रिंक्सपासून दूर राहा. चांगल्या पर्यायांमध्ये लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा कमी साखर असलेले ड्रिंक्स निवडा. नववर्ष 2026 ची सुरुवात जर आरोग्यदायी पद्धतीने केली, तर तुमचं आरोग्य उत्तम राहू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world