जाहिरात

सकाळी रिकाम्या पोटी केळे खाणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Banana On An Empty Stomach: मधुमेह, अ‍ॅसिडिटी किंवा गॅस यासारखी समस्या असेल तर रिकाम्या पोटी केळे खाणे फायदेशीर ठरेल का? यामुळे शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

सकाळी रिकाम्या पोटी केळे खाणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या फायदे आणि तोटे
रिकाम्या पोटी केळे खाणे फायदेशीर ठरेल का?

Banana On An Empty Stomach: केळ्यामध्ये पौष्टिक गुणधर्मांचा मोठा साठा आहे, म्हणूनच काही जण सकाळी रिकाम्या पोटी हे फळ खाणे पसंत करतात. पण ही सवय आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही? याबाबत बऱ्याच लोकांना माहिती नसते. रिकाम्या पोटी केळे खाणे फायदेशीर तसेच हानिकारक सुद्धा ठरू शकते, असे काही लोकांचे म्हणणंय. रिकाम्या पोटी केळे खाणे काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते, पण काही लोकांसाठी तितकेच हानिकारकही असते. योग्य पद्धतीने केळे खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळेल तसेच ते पचनप्रक्रिया आणि हाडांसाठीही फायदेशीर ठरेल. मधुमेहग्रस्त, अ‍ॅसिडिटी किंवा गॅसची समस्या असेल तर केळे रिकाम्या पोटी खाणे टाळा. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

केळी खाण्याचे फायदे (Benefits of Eating Banana) 

  • ऊर्जा मिळते : केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. 
  • पचनप्रक्रियेसाठी फायदेशीर : केळ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
  • हाडे मजबूत होतात : केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम अधिक प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे तसेच स्नायू मजबूत होतात. 
  • रक्तदाब : केळ्यातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Heart Health Tips: आयुष्यातील हा दाब तुमचे हृदय पाडेल पूर्णपणे बंद, हृदयाची धडधड सुरू ठेवण्यासाठी घ्या ही काळजी

(नक्की वाचा: Heart Health Tips: आयुष्यातील हा दाब तुमचे हृदय पाडेल पूर्णपणे बंद, हृदयाची धडधड सुरू ठेवण्यासाठी घ्या ही काळजी)

रिकाम्या पोटी केळे खाण्याचे तोटे (Disadvantages of Eating Banana On Empty Stomach)

  • रक्तशर्करा वाढू शकते : केळ्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण असते, त्यामुळे रिकाम्या पोटी केळे खाल्ल्यास रक्तशर्करेची पातळी वाढू शकते.  
  • अ‍ॅसिडिटी आणि गॅसची समस्या : काही लोकांना रिकाम्या पोटी केळे खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी किंवा गॅसच्या समस्येचा सामना करावा लागतो. 
  • मॅग्नेशियमची पातळी वाढू शकते : रिकाम्या पोटी केळे खाल्ल्यास शरीरामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Acharya Balkrishna यांनी वाढलेल्या Uric Acid वर सांगितला उपाय, या जादुई औषधामुळे शरीर होईल डिटॉक्स

(नक्की वाचा: Acharya Balkrishna यांनी वाढलेल्या Uric Acid वर सांगितला उपाय, या जादुई औषधामुळे शरीर होईल डिटॉक्स)

केळे खाण्याची योग्य पद्धत (Kele Khanyachi Yogya Padhat)

दूध, दही किंवा सुकामेव्यासोबत केळे खाऊ शकता.  रिकाम्या पोटी केळे खाणे टाळा आणि नाश्त्यामध्ये या फळाचा समावेश करावा. मधुमेह किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com