थंडीच्या सुरुवातीला रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमी झाल्यामुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास होणे सामान्य आहे. यावर लोक अनेकदा तात्पुरत्या औषधांचा वापर करतात. पण आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या नैसर्गिक घटकांनी या समस्येवर प्रभावी उपाय करता येतो. एक छोटासा लिंबू वापरून तुम्ही जुन्यात जुना सर्दी-खोकलाही दूर करू शकता. हा घरगुती आणि सोपा उपाय कसा करायचा, हे जाणून घेऊया.
नक्की वाचा - राग नियंत्रणात आणण्यासाठी करा हे 5 योगासन; मनःशांतीसोबत रक्तदाबही राहील स्थिर
एक लिंबू घ्या आणि तो मंद आचेवर हलका काळा होईपर्यंत भाजा. लिंबू गॅसवरून उतरवून त्याचे दोन भाग करा. एका चमच्यात किंवा लहान वाटीत लिंबाचा रस पूर्णपणे पिळून घ्या. या रसामध्ये रसाच्या प्रमाणानुसार मीठ (Salt) मिसळून चांगले ढवळा आणि प्या. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जुनाट सर्दी आणि खोकल्यापासून त्वरित आराम मिळेल. हा घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच आराम मिळवून देईल. सध्या थंडीचे दिवस येत आहे. त्यावेळी हा उपाय रामबाण ठरू शकतो.
नक्की वाचा - Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?
- या उपायाचे आरोग्यदायी फायदे या नुसत्याचे अनेक फायदे आहेत, जे सर्दी-खोकल्यात मदत करतात.
- घसादुखी कमी: लिंबाचा आंबटपणा घशातील खवखव कमी करून आराम देतो.
- कफ साफ: मीठ आणि लिंबाचे मिश्रण घशात जमलेला बलगम (कफ) साफ करण्यास मदत करते.
- बंद नाक: लिंबू नाकातील अडथळा दूर करून मोकळ्या श्वासोच्छवासासाठी मदत करते.
- शरीराला उष्णता: गरम लिंबाच्या रसाची तासीर शरीराला आतून ऊब देण्यास उपयुक्त ठरते.
- रोगप्रतिकारशक्ती: लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी (Vitamin C) शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.