Yoga Poses For Stress Relief: आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात, आपल्या भावनांवर, विशेषत: रागावर नियंत्रण ठेवणे ही एक मोठी समस्या बनली आहे. कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि अनिश्चितता यामुळे व्यक्तीमध्ये तणाव आणि चिडचिडेपणा वाढतो. वाढलेला राग केवळ आपले नातेसंबंध बिघडवत नाही, तर थेट आपल्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम करतो. जसे की रक्तदाब (BP) वाढणे. अशावेळी योग (Yoga) हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय म्हणून समोर येतो.
आयुष मंत्रालयाच्या माहितीनुसार, योगामध्ये प्राणायाम आणि विविध आसनांचे विशेष महत्त्व आहे. प्राणायाम, म्हणजेच श्वासावर नियंत्रण ठेवण्याची कला, आपल्या मेंदूला आणि भावनांना शांत करण्याचे एक अद्भुत तंत्र आहे. शरीरातील आणि मनातील ऊर्जेचा समतोल (Energy Imbalance) बिघडल्यास राग वाढतो, आणि योग या असंतुलनावर मात करण्यास मदत करतो.
नक्की वाचा - Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?
राग नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त 5 योगासने आणि प्राणायाम
भस्त्रिका प्राणायाम:
या जलद श्वासोच्छ्वास क्रियेमुळे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. यामुळे शरीरातील ऊर्जेचा समतोल साधला जातो आणि मनाला तत्काळ शांती व स्थिरता मिळते.
शीतली प्राणायाम:
या प्राणायामामुळे शरीराचे तापमान आणि मनाची तीव्रता नियंत्रित होते. रागाच्या वेळी शरीरात निर्माण होणारी उष्णता आणि उत्तेजना कमी होऊन मन शांत होते.
अनुलोम-विलोम प्राणायाम:
हे प्राणायाम मेंदूच्या दोन्ही बाजूंचा समन्वय साधते. यामुळे विचार अधिक स्पष्ट होतात आणि मनाचे संतुलन राखले जाते. ज्यामुळे भावनांवर चांगले नियंत्रण मिळवता येते.
बालासन (Child's Pose):
या आसनात शरीर लवते आणि स्नायूंवरील ताण कमी होतो. यामुळे शारीरिक व मानसिक जकडण दूर होते आणि नकारात्मक भावना शांत होतात.
शवासन (Corpse Pose):
अत्यंत प्रभावी असे हे आसन आहे. यामध्ये शरीर पूर्णपणे शिथिल करून श्वासावर लक्ष केंद्रित केले जाते, ज्यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि तीव्र भावना (जसे की राग) शांत होतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world