Ayurvedic Beauty Oil: आजच्या धावपळीच्या जीवनात स्किनकेअर रुटीन फॉलो करणं हे सेल्फ केअरचा महत्त्वाचा भाग मानले जाते. विशेष म्हणजे लोक केमिकलयुक्त प्रोडक्ट्स सोडून आता नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपचारांकडे वळत आहेत. याच कारणामुळे जुन्या काळातील घरगुती नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आले आहेत. यापैकीच एक म्हणजे 'नलपामरादि तैलम' जे गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हे हर्बल तेल स्किन ब्राइटनिंग, टॅन घालवण्यासाठी आणि त्वचेला आतून निरोगी ठेवण्यासाठी ओळखले जाते. शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा आजच्या मॉडर्न स्किनकेअर रुटीनमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करत आहे.
नलपामरादि तैलम का व्हायरल होत आहे?
नलपामरादि तैलमच्या लोकप्रियतेमागील सर्वात मोठे कारण म्हणजे नैसर्गिक आणि सुरक्षित स्किनकेअरची वाढती मागणी. लोकांना आता अशी उत्पादने हवी आहेत जी कोणत्याही दुष्परिणामांशिवाय (Side effects) चांगले परिणाम दाखवतील.
- टॅन रिमूव्हलमध्ये प्रभावी: हे तेल उन्हामुळे झालेलं टॅनिंग हळूहळू कमी करते.
- नैसर्गिक चमक (Natural Glow): त्वचेला आतून पोषण देऊन त्वचेवरील चमक वाढवते.
- सोशल मीडिया ट्रेंड: अनेक युजर्सनी त्यांचे 'बिफोर-आफ्टर' रिझल्ट्स शेअर केले आहेत.
- आयुर्वेदावरील विश्वास: हजारो वर्षांची परंपरा असल्यामुळे लोकांचा विश्वास अधिक वाढला आहे.
- हे तेल आजचे दोन मोठे ट्रेंड्स, नॅचरल ब्युटी आणि ट्रॅडिशनल वेलनेस याचे एक उत्तम मिश्रण आहे.
तेलामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे?
नलपामरादि तैलम हे अनेक शक्तिशाली औषधी वनस्पतींचे मिश्रण आहे:
-
चार फायकस झाडांची साल: वड, पिंपळ, औदुंबर आणि प्लक्ष
- हळद (Turmeric): अँटी-सेप्टिक आणि त्वचा उजळण्यास उपयुक्त
- वाळा : त्वचेला थंडावा आणि ताजेपणा मिळतो.
- आवळा (Amla): त्वचेची दुरुस्ती (Repair) आणि पुनरुज्जीवन करते.
- नारळ किंवा तिळाचे तेल: त्वचेला खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो.
- या सर्व घटकांमुळे त्वचेला असंख्य फायदे मिळतात.
- नलपामरादि तैलमचा इतिहास सुमारे 3,000 वर्षे जुना मानला जातो आणि याचा संबंध केरळच्या आयुर्वेदिक परंपरेशी आहे.
- पूर्वी याचा वापर भाजल्यामुळे होणाऱ्या जखमा आणि त्वचेची जळजळ (Inflammation) कमी करण्यासाठी केला जात असे.
- नवजात बालकांच्या मसाजसाठी देखील याचा सौम्य स्वरूपात वापर केला जायचा.
- जागतिक युद्धाच्या काळात, महिलांनी हे तेल घरी बनवून साठवून ठेवण्यास सुरुवात केली.
- काळाबरोबर हा फॉर्म्युला पिढ्या-न्-पिढ्या पुढे जात राहिला आणि आज तो मॉडर्न स्किनकेअरचा एक अविभाज्य भाग बनला आहे.
-
आंघोळीपूर्वी शरीराला हलक्या हाताने तेल लावा.
- 15-20 मिनिटे तेल शरीरावर तसेच राहू द्या.
- त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्यावी.
- आठवड्यातून 2-3वेळा याचा वापर करा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)