Why Feel Tired After Sleeping 8 Hours: अनेकदा रात्री सात ते आठ तासांची पुरेशी झोप घेऊनही सकाळी उठल्यावर थकवा जाणवणे, ताजेतवाने न वाटणे किंवा सतत ग्लानी येणे अशी तक्रार अनेक जण करतात. डॉ. रविंद्र कुलकर्णी यांच्या मते, हा थकवा अपुऱ्या रीकव्हरीचा संकेत असतो. सकाळचा थकवा केवळ झोपेच्या वेळेवर नाही, तर झोपेच्या गुणवत्तेवर आणि तुमच्या मेटाबॉलिक हेल्थवर अवलंबून असतो. मोबाइलचा अतिवापर, ताणतणाव यासोबतच घोरणे किंवा स्लीप ॲप्निया यासारखे गंभीर आजारही याला कारणीभूत असू शकतात. या लेखाद्वारे आपण डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी सांगितलेली सकाळच्या थकव्यामागची खरी कारणे आणि शरीर देणारे महत्त्वाचे संकेत सविस्तर जाणून घेणार आहोत.
- डॉ. रविंद्र कुलकर्णी
“रात्रभर झोपूनही सकाळी थकवा का वाटतो?”
अनेक लोक म्हणतात:
“सर… मी 7 - 8 तास झोपतो…
पण सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही.”
थकवा हा अनेक वेळा कामामुळे नसतो… तो रीकव्हरी अपुरी असल्याचा संकेत असतो.
1. झोपेचा वेळ आणि झोपेची गुणवत्ता वेगवेगळी असते
8 तास बेडवर पडून राहणं म्हणजे 8 तास चांगली झोप झालीच असं नाही.
मी अनेकदा पाहतो
झोप पूर्ण
पण शरीर थकल्यासारखं
कारण प्रश्न झोपेच्या कालावधीचा नसून गुणवत्तेचा असतो.
2. सकाळी उठल्यावर तुम्हाला कसं वाटतं?
हा एक महत्त्त्वाचा हेल्थ मार्कर आहे.
कारण शरीर रात्रभर स्वतःची दुरुस्ती (repair) आणि रीकव्हरी(recovery) करत असतं.
सकाळी उठल्यावर जर शरीर तयार वाटत नसेल, तर शरीर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं.
(नक्की वाचा : How To Relieve Tired Feet At Home: पायांचा थकवा, सूज, ताण होईल छुमंतर! फॉलो करा 20 मिनिटांचा घरगुती फॉर्म्युला)
3. OPD मध्ये सर्वात जास्त दिसणारा पॅटर्न कोणता?- उशीरापर्यंत mobile
- तुटक झोप
- कामाचा ताण
- अनियमित झोपेची वेळ
आणि मग एनर्जीच राहत नाही.”
4. काही वेळा समस्या झोपेची नसते…श्वासाची असते.
विशेषतः:
- घोरणे
- रात्री वारंवार जाग येणे
- सकाळी डोके जड वाटणे
- दिवसा झोप येणे
अशी लक्षणे असतील तर स्लीप अॅप्नीयाचा (Sleep Apnea) विचार करावा लागतो.
मी अनेक रुग्णांमध्ये बीपी(BP), मधुमेह (Diabetes), फॅटी लिव्हर (Fatty Liver) आणि सततचा थकवा यामागे हेच कारण पाहिलं आहे.
(नक्की वाचा : Imli Facts: चिंच खाल्ल्याने खरंच उंची वाढत नाही? लहानपणी तुम्हीही खाल्लाय का आईचा ओरडा, धक्कादायक सत्य समोर)
5. मेटाबॉलिक हेल्थ (Metabolic Health) आणि सकाळचा थकवा यांचा संबंध खूप जवळचा आहे.
विशेषतः:
- लठ्ठपणा (Obesity)
- मधुमेह (Diabetes)
- फॅटी लिव्हर (Fatty Liver)
- इन्सुलिन रेसिस्टन्स (Insulin Resistance)
असताना
“मी झोपतो… पण रीफ्रेश होत नाही.”
ही तक्रार वारंवार ऐकायला मिळते.
6. एक छोटी सेल्फ टेस्ट (Self-Test) करा
सकाळी उठल्यावर:
- चालायला उत्साह वाटतो?
- शरीर हलकं वाटतं?
- मेंदू स्पष्ट विचार करतो?
की
- अर्लामचं स्नुझ (Snooze) बटण पुन्हा पुन्हा दाबता?
- चहा किंवा कॉफीशिवाय दिवस सुरू होत नाही?
- उठल्यावरही थकल्यासारखं वाटतं?
हे सुद्धा शरीराचे संकेत आहेत.
7. माझ्या अनुभवात एक मनोरंजक गोष्ट दिसते
काही लोकांची:
- Sugar सुधारते
- BP नियंत्रणात येतो
- Weight कमी होतो
पण ते म्हणतात:
“Doctor, अजूनही फ्रेश वाटत नाही.”
कारण शरीरातील numbers आधी सुधारतात…
Recovery नंतर सुधारते.
म्हणूनच रीपोर्ट्सबरोबरच शरीराची भावना (body feedback) सुद्धा महत्त्वाची असते.
8. माझ्या मते एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा
“मी किती तास झोपलो?”
यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे:
“मी किती फ्रेश उठलो?”
कारण झोपेचं खरं उद्दिष्ट झोपणं नसतं…
तर रीकव्हरी असतं.
आणि रीकव्हरी होत नसेल…
तर शरीर अनेक वेळा सकाळच्या थकव्यामधून आधीच संकेत देत असतं.
9. मग सुधारणा कुठून सुरू करावी?
माझ्या अनुभवात:
- नियमित हालचाल
- झोपेची निश्चित वेळ करा
- रात्री स्क्रीन टाइम कमी करा
- वजन आणि कंबर नियंत्रण
- घोरणे किंवा स्लीप अॅप्नीयाकडे (Sleep Apnea) दुर्लक्ष न करणे
यातून खूप चांगले परिणाम दिसतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world