घरांना किंवा इमारतींना आग लागण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. शॉर्ट सर्किट हे अनेकदा आग लागण्याचं प्रमुख कारण असतं. घरातील एसी, फ्रीज यासारख्या उपकरकणांवर अतिरिक्त दबाव पडल्याने शॉर्ट सर्किटचा धोका अधिक असतो. शॉर्ट सर्किटचा धोका टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली तर संभाव्य धोका टाळता येऊ शकतो.
शॉर्ट सर्किट होण्याची कारणे
शॉर्ट सर्किट अत्यंत धोकादायक असून यामुळे आग लागण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिक उपकरणांचं देखील मोठं नुकसान होतं. उच्च दाबाच्या उपकरणांमुळे अनेकदा दबाव वाढतो आणि जास्तीच्या दबावामुळे विजेचा प्रवाह बिघडतो. ज्यामुळे विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट होतो.
(नक्की वाचा: AI चॅटबॉट हिरावून घेणार तुमची नोकरी? ChatGPT 4oने शेअर केली भारतातील ही यादी)
अनेकदा वायरिंग योग्य नसेल किंवा खराब वायरिंगमुळे इन्सुलेशन तुटतं आणि शॉर्ट सर्किट होतो. दोन तारा चिटकल्यानंतरच शॉर्ट सर्किट होतो असं नाही. शॉर्ट सर्किटची अनेक कारणे असू शकतात. अनेक घरांमध्ये सर्किट ब्रेकर असतात जे शॉर्ट सर्किटनंतर ट्रिप होतात. सर्किट ब्रेकर वारंवार ट्रिप होत असेल तर तातडीने घरात तपासणी करुन घ्यावी.
शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी काय कराल?
- शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी घरातील वापरात नसलेले उपकरणे अनप्लक करावे.
- फ्यूज करंट प्रवाह योग्य नियंत्रित करतो आणि शॉर्ट सर्किट होण्यापासून टाळतो. त्यामुळे क्वालिटी फ्यूजचा वापर करावा.
- इन्सुलेशनमधील खराबीमुळे देखील शॉर्ट सर्किट होऊ शकते. त्यामुळे तुमच्या घरातील विजेच्या तारा एक्सपोज्ड, जुन्या होऊ नये आणि इन्सुलेशन योग्य आहे का हे वेळोवेळी तपासून पाहा.
- पाणी किंवा अधिक उष्णतेमुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते. त्यामुळे घरातील विजेची उपकरणे उष्णतेपासून दूर ठेवावी आणि त्यांच्या आजूबाजूची जागा सुकी ठेवावी.
(नक्की वाचा: ऑनलाइन जेवण मागवताय, थांबा! त्याआधी ही बातमी वाचा...)
घरात विजेच पॉईंट कमी असल्यास अनेकदा एकाच आऊटलेट किंवा सॉकेटमध्ये अनेक प्लग लावले जातात. ज्यामुळे सॉकेटवर लोड येतो आणि शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. त्यामुळे एकाच सॉकेटमध्ये अनेक उपकरणांचे प्लग लावणे टाळा.
घरातील उपकरणांच्या वायर वेळोवेळी चेक करा. एखाद्या उपकारणाची वायर योग्य नसेल तर ती बदला. घरातील विजेचे सर्किट वेळोवेळी तपासा आणि त्याची दुरुस्ती करा.