- सोलापूर जिल्हा भारतातील सर्वाधिक कलिंगड उत्पादनासाठी ओळखला जातो
- सोलापूरची माती आणि हवामान कलिंगडच्या शेतीसाठी अनुकूल आहे
- उन्हाळ्यात सोलापूरमधून दररोज हजारो ट्रक भरून कलिंगड देशातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाठवले जातात
India's Watermelon Capital: उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असणारे फळ म्हणजे कलिंगड. लाल, रसाळ आणि पाण्याने भरपूर असे हे फळ केवळ थंडावाच देत नाही, तर शरीराला हायड्रेट ठेवण्यासही मदत करते. पण तुम्हाला माहिती आहे का, भारताची 'कलिंगड राजधानी' (Watermelon Capital) कोणती आहे. महाराष्ट्रातील सोलापूर शहराची ओळख आता देशाची कलिंगड राजधानी निर्माण झाली आहे. सोलापूरमध्ये उन्हाळ्यात कुठे ही गेलात तरी तुम्हाला कलिंगड दिसतील.
सोलापूरची खास ओळख
सोलापूर जिल्हा हा मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या कलिंगड उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. उन्हाळा सुरू झाला की, सोलापूरच्या महामार्गांच्या कडेला दूरवर पसरलेल्या शेतांमध्ये फक्त कलिंगड दिसतात. जसा जसा पारा वाढतो, तशी बाजारपेठेत कलिंगडाची आवकही वेगाने वाढते. आज देशातील सर्वात मोठ्या कलिंगड उत्पादक भागांमध्ये सोलापूरचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सर्वाधिक कलिंगड उत्पन्न हे सोलापूरात होतं. इथं संपूर्ण महाराष्ट्रात कलिंगड मार्केटमध्ये जात असतात.
सोलापूरचे कलिंगड का आहे खास?
सोलापूरची माती आणि हवामान कलिंगड शेतीसाठी अत्यंत पूरक मानले जाते. येथील उष्ण हवामान आणि कडक ऊन कलिंगड लवकर पिकण्यास आणि दर्जेदार होण्यास मदत करते. येथील कलिंगड आकाराने मोठे, चवीला गोड आणि जास्त रसाळ असतात. त्यामुळेच या कलिंगडांना केवळ महाराष्ट्रातच नाही, तर परराज्यातही मोठी मागणी असते. उन्हाळ्यात येथून दररोज शेकडो ट्रक भरून कलिंगड देशाच्या विविध भागात पाठवले जातात.
शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा मोठा स्रोत
सोलापूरमधील हजारो शेतकऱ्यांसाठी कलिंगड शेती हे उत्पन्नाचे प्रमुख साधन बनले आहे. कलिंगड हे पीक साधारणपणे 70 ते 90 दिवसांत तयार होते, त्यामुळे कमी वेळात चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात वाढत्या तापमानामुळे मागणी वाढते आणि शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. सोलापूर जिल्ह्याने आपल्या पोषक हवामानाचा वापर करत कलिंगड उत्पादनात देशात नाव कमावले आहे. केवळ स्थानिक बाजारपेठच नव्हे, तर उत्तर भारतातही सोलापूरचे कलिंगड मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे. कमी कालावधीचे पीक आणि वाढती मागणी यामुळे सोलापूरच्या कृषी अर्थव्यवस्थेत कलिंगड उत्पादनाचा वाटा महत्त्वपूर्ण ठरत आहे.