जाहिरात

Surya Grahan 2026: सूर्यग्रहण 16 की 17 फेब्रुवारी? गोंधळ दूर करा! ज्योतिषाचार्यांनी सांगितली तारीख आणि वेळ

Solar Eclipse (Surya Grahan) 2026: पंचांगानुसार वर्ष 2026चे पहिले सूर्य ग्रहण फेब्रुवारी महिन्यात कधी आहे? 12 राशींवर याचा काय परिणाम होईल? हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का?

Surya Grahan 2026: सूर्यग्रहण 16 की 17 फेब्रुवारी? गोंधळ दूर करा! ज्योतिषाचार्यांनी सांगितली तारीख आणि वेळ
"Surya Grahan 2026 on February 17: वर्षाच्या पहिल्या सूर्य ग्रहणाची तारीख आणि वेळ"
Canva

Solar Eclipse 2026, Surya Grahan: दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अनेक खगोलीय घटना घडतील किंवा ग्रहणाच्या स्थिती निर्माण होतील, ज्याचा उल्लेख होताच अनेकदा लोकांच्या मनात शंका-कुशंका निर्माण होतात. फेब्रुवारी 2026मध्ये वर्षाचे पहिले सूर्यग्रहण (Surya Grahan Date) लागणार आहे, या सूर्यग्रहणाबाबत लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. सूर्यग्रहण 16 फेब्रुवारी की 17 फेब्रुवारी रोजी आहे? असा प्रश्न लोकांसमोर निर्माण झालाय. हे ग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का? सूतक काळ पाळावा लागेल का? आणि 12 राशींवर याचा काय परिणाम होईल? प्रख्यात ज्योतिषाचार्य पं. कृष्ण गोपाल मिश्र यांनी या सर्व प्रश्नांची दिलेली उत्तरं जाणून घेऊया... 

16 फेब्रुवारी की 17 फेब्रुवारी, सूर्यग्रहण कधी आहे? | When Is Surya Grahan | Solar Eclipse 2026

वर्ष 2026मधील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 03:26 वाजता सुरू होणार असून संध्याकाळी 07:52 वाजता ग्रहण समाप्त होणार आहे. याचा मध्य काळ संध्याकाळी 5.42 वाजता असेल.

Latest and Breaking News on NDTV

सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का? | Solar Eclipse 2026 In India

ज्योतिषाचार्य कृष्ण गोपाल मिश्र यांच्या मते, वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण केवळ अंटार्क्टिका आणि दक्षिण आफ्रिकेच्या काही भागातच दिसणार आहे.  

भारतात सूतक काळ पाळवा की पाळू नये? | Solar Eclipse 2026 Sutak Kaal

पंचांगानुसार सूर्यग्रहणाचा सूतक काळ ग्रहणापूर्वी 12 तास आधी सुरू होतो. पण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे येथे सूतक काळ पाळण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे भारतातील लोक अमावस्येनिमित्त केले जाणारे पूजा-पाठ, धार्मिक विधी आणि दैनंदिन कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय करू शकतात. या दिवशी पितृश्राद्ध किंवा तर्पण विधी करण्यासही कोणतीही मनाई नसेल.

Latest and Breaking News on NDTV

कोणती रास आणि नक्षत्रामध्ये ग्रहण लागणार? 

हे सूर्यग्रहण कुंभ राशी आणि धनिष्ठा नक्षत्रात लागणार आहे. हे एक वलयाकार सूर्यग्रहण असेल, ज्यामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकणार नाही. ग्रहणाच्या वेळी कर्क लग्न उदित होत आहे, ज्यामुळे अष्टम भावात सर्व ग्रहांची युती होत आहे, जे ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. याचा परिणाम प्रामुख्याने पाश्चात्य देशांवर दिसून येईल. तिथे अतिवृष्टी किंवा वादळ यासारखी नैसर्गिक संकटे उद्भवू शकतात.

सूर्यग्रहणाचा 12 राशींवर कोणता परिणाम होईल? | 17th February Rashifal
  • मेष राशीसाठी हे ग्रहण शुभ ठरेल. सुख-सोयींच्या वस्तूंवर अधिक खर्च होऊ शकतो.
  • वृषभ राशीसाठी हे ग्रहण अत्यंत लाभदायी ठरेल, मोठ्या आर्थिक फायद्याची शक्यता आहे.
  • मिथुन राशीसाठी हे ग्रहण सामान्य असेल. व्हायरल ताप (Viral Fever) यासारख्या समस्या जाणवू शकतात.
  • कर्क राशीच्या लोकांनी प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. पोटाशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात.
  • सिंह राशीचे लोक नातेसंबंधांमधील समस्यांमुळे त्रस्त होऊ शकतात. विवाहित दाम्पत्यांचे जीवन किंवा पार्टनरशिपमध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 
Latest and Breaking News on NDTV
  • कन्या राशीच्या लोकांना थोड्या प्रमाणात मानसिक त्रास जाणवू शकतो. 
  • तूळ राशीच्या लोकांच्या भावनिक संवेदनशीलतेत वाढ होईल. अति हळवेपणा टाळावा.
  • वृश्चिक राशीच्या लोकांना पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या गोष्टीच्या संसर्गाचा धोका होऊ शकतो.
  • धनु राशीच्या लोकांनी सूर्यग्रहणानंतर अहंकारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा नुकसान होऊ शकते.
  • मकर राशीच्या लोकांना सूर्यग्रहण आर्थिक दृष्ट्या शुभ ठरणार आहे. धनलाभ होऊ शकतो, पण घाईघाईत निर्णय घेऊ नका.
  • कुंभ राशीच्या लोकांनी थंडीपासून स्वतःचा बचाव करा. कंबरदुखीचा त्रास जाणवू शकतो.
  • मीन राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा अधिक प्रभाव असेल. प्रत्येक काम सावधगिरीने आणि समजूतदारपणे करावे लागेल.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com