'धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे' हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे फुप्फुसाचा कर्करोग, हृदयविकार आणि अर्धांगवायूसारखे आजार होतात.
इतकेच नाही तर, सिगारेटच्या पाकिटांवर धूम्रपानाचे धोके मोठ्या अक्षरात छापलेले असतात. त्याचबरोबर तंबाखूच्या सवयीमुळे होणारे नुकसान आपण टीव्हीवर आणि सिनेमागृहांमध्ये जाहिरातीच्या रुपात पाहतच असतो. हे सर्व माहीत असतानाही अनेकजण या सगळ्या व्यसनांच्या आहारी जात असल्याचं आपण पाहतो. पण, सर्व कर्करोगांमध्ये लंग्स म्हणजेच फुफ्फुसाचा कर्करोग हा सर्वात सामान्य आजार आहे. याचं एक मुख्य कारण म्हणजे 'धूम्रपान'. धूम्रपान न केल्यास फुफ्फुसाचा कर्करोग होणार नाही, असा समजही पूर्णपणे चुकीचा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
असे अनेकजण आहेत ज्यांना, कधीही सिगारेट न पिता फुफ्फुसाचा कर्करोग होतो. मात्र सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटलमधील डॉक्टर चटर्जी म्हणतात, कर्करोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांपैकी 80 टक्के रुग्णांमध्ये सिगारेट आणि तंबाखूचं सेवन करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. मात्र, उर्वरित 20 टक्के लोक सिगारेट किंवा तंबाखू दोन्हीचही व्यसन नाही. त्यामुळे, तंबाखूचं सेवन न करणाऱ्यांना, सिगारेट न पिणाऱ्यानांही कर्करोग होतो.
फुफ्फुस कसं काम करतात? कर्करोगामुळे फुप्फुसांचं नुकसान कसं होतं?
फुफ्फुसे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. फुफ्फुसांद्वारे, नाकावाटे आत घेतलेल्या हवेतील प्राणवायू, वायुकोष्ठिकांच्या साहाय्याने रक्तात शोषून घेतला जातो. त्यानंतर हवेतील घटक आणि तयार झालेला कार्बन-डाय-ऑक्साईड फुफ्फुस परत नाकावाटे बाहेर सोडते. डॉ. चॅटर्जी म्हणतात, जेव्हा मानवी शरीर धूम्रपानासारख्या बाह्य रसायनांच्या संपर्कात येते, तेव्हा ते फुफ्फुसाच्या पेशी हळूहळू नष्ट करते आणि मग घातक पेशी बनवू लागतात. या पेशी आपल्या श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेवर परिणाम करतात.
(नक्की वाचा: पटापट वेटलॉससाठी फॉलो करा हे डाएट प्लान, विराट कोहली-दिशा पाटनीचंही आहे तेच सीक्रेट)
फुफ्फुसाच्या कर्करोगाची कारणे
1.तंबाखू आणि धूम्रपान:
भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सर्वात मुख्य कारण म्हणजे तंबाखू आणि धूम्रपान. 10 पैकी 9 रुग्णांमध्ये हे कर्करोगाचं प्रमुख कारण आहे. याशिवाय पॅसिव्ह स्मोकिंगमुळेही फुफ्फुसाचा कर्करोग होतो. उदाहरणार्थ, तुम्ही सिगारेट किंवा विडी ओढत असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असाल तर तुम्हालाही कॅन्सर होण्याची शक्यता आहे.
बीबीसीमधील लेखानुसार, ब्रिटनमधील कर्करोग संशोधनाचे प्रमुख चार्ल्स स्वांटन यांनीही या मुद्द्याचं समर्थन केलं आहे.
ते म्हणतात, “धूम्रपान न करणाऱ्यांनाही फुफ्फुसाचा कर्करोग होणं ही काही क्षुल्लक गोष्ट नाही. "माझ्या काळात, फुफ्फुसाचा कर्करोग असलेले 5-10 टक्के रुग्ण होते, परंतु त्यांनी कधीही धूम्रपान केलं नव्हतं."
2.वायुप्रदूषण:
आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. विशेषतः मोठमोठ्या शहरांमध्ये आणि वायू प्रदूषणामुळे कर्करोग होण्याची दाट शक्यता असते.
वाहतुकीचा खोळंबा, उद्योगधंद्यांचा रासायनिक कचरा, कचरा जाळण्याचे अवशेष यामुळे फुफ्फुसाच्या पेशींचं नुकसान होतं आणि कर्करोगाचा धोका वाढतो.
रेडॉन एक रेडियोएक्टिव गॅस आहे. जो कोणत्याही बांधकाम साइटवर आढळतो. किंवा कोणत्याही प्रकारच्या धूळ, मातीत असतो. जर एखादी व्यक्ती अशा ठिकाणी जास्त वेळ असेल तर त्या व्यक्तीला फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक आहे.
(नक्की वाचा: Hair Care Tips : या 5 गोष्टींचे करा सेवन, गळणार नाही तुमचा एकही केस)
फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे
फुफ्फुसाच्या कर्करोगाची बहुतेक लक्षणे इतर कमी गंभीर आजारांसारखीच असतात. काही लोकांमध्ये रोग गंभीर होईपर्यंत रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत, परंतु काही लोकांमध्ये या आजाराची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यातच दिसू लागतात.
श्वास घेण्यात अडचण किंवा धाप लागणे.
छातीत दुखणे किंवा अस्वस्थता.
खोकला रक्त येणे
कर्कशपणा
भूक न लागणे.
वजन कमी होणे.
थकवा.
खांदा दुखणे.
चेहरा, मान, हात किंवा वरच्या छातीवर सूज येणे
चेहऱ्यावर थोडासा घाम येणे (हॉर्नर सिंड्रोम).
ही फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत.
उपाय
फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या आजारापासून दूर राहण्यासाठी धूम्रपान आणि तंबाखूच्या सेवनापासून दूर राहणे आवश्यक आहे यावर डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञनांचे मत आहे.
धुम्रपान करणाऱ्या ठिकाणांपासून अंतर ठेवा, वायू प्रदूषित वातावरणात सावध राहा, रसायने उत्सर्जित होणाऱ्या ठिकाणांपासून अंतर ठेवा.
कुटुंबात फुफ्फुसांचा कर्करोग झालेली व्यक्ती असेल तर, बऱ्याचदा ते जेनिटिक असू शकते.
जे लोक धूम्रपान करत नाहीत आणि त्यांनाही फुफ्फुसाचा कर्करोग होतो. असे बहुतेक रुग्ण ज्यांना हा रोग अनुवांशिकरित्या कर्करोग होतो.
वरील माहिती फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचे समर्थन किंवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world