जाहिरात
16 hours ago

Mahavikas Aaghadi Satyacha Morcha Mumbai LIVE Updates:  मतचोरी, मतदार यादीतील घोळ, दुबार मतदार आणि निवडणुकांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे यांनी एकत्रित येत आज निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढण्याचं जाहीर केलं आहे. या मोर्चाला मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेते, डाव्या पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रिटवरून सुरू होईल. मेट्रो सिनेमामार्ग मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल. मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी दुपारी 1 ते 4 या वेळेत मोर्चा निघणार आहे.  
 

MNS MVA Morcha Live Updates: कायदेशीर पुरावे घेऊन कोर्टात जाणार - उद्धव

MNS MVA Morcha Live Updates: ' राज्यात मत चोर दिसेल तिथल्या तिथे लोकशाहीचा मार्गाने फटकावला पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. निवडणूक येईल तशी यांची दडपशाही सुरू होईल. कायदेशीर पुरावे घेऊन आम्ही कोर्टात जाणार जेव्हा कधी निकाल येईल तेव्हा बघू, ' असं उद्धव यांनी सांगितलं. निवडणूक आयोग लाचार झाला आहे, असा आरोप उद्धव यांनी केला.

MNS MVA Morcha Live Updates: 'निवडणूक आयोगाची लोकं घरी आले होते', उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

MNS MVA Morcha Live Updates: काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाची लोकं घरी आली होती, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. सक्षम या  अ‍ॅप वरून अर्ज केला होता. माझ्या नावाने OTP काढण्याचा प्रयत्न झाला. 23 ऑक्टोबर 2025 रोजी अर्ज करण्यात आला.  मतदार यादीतून आमच्या घरातील चौघांची नावं बाद करण्याचा प्रयत्न केला गेला का? असा प्रश्न उद्धव यांनी विचारला. 

MNS MVA Morcha Live Updates: अ‍ॅनाकोंडाची भूक संपत नाही - उद्धव ठाकरे

MNS MVA Morcha Live Updates:  संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर पहिल्यांदाच सगळ्या विरोधी पक्षांची एकजूट झाली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. आता जागे व्हा नाहीतर अ‍ॅनाकोंडा येईल मी अॅनाकोंडा बोललो कारण यांची भूक संपत नाही, पक्ष चोरला, सगळं घेतलं असा आरोप उद्धव यांनी केला. 

MNS MVA Morcha Live Updates: उद्धव ठाकरेंचे भाषण सुरु, सरकारला दिला इशारा

MNS MVA Morcha Live Updates:  राज ठाकरे नंतर या मोर्च्यात उद्धव ठाकरेंचे भाषण सुरु झाले. त्यांनी यावेळी सुरुवातीला आज फक्त ठिणगी पडली आहे, वणवा पेटायला वेळ लागणार नाही, अला इशारा सरकारला दिला. 

MNS MVA Morcha Live Updates: राज ठाकरेंनी सांगितली दुबार मतदारांची यादी

मुंबई उत्तर पूर्व - ९२९८३ दुबार मतदार

उत्तर मुंबई -  ६३७४० दुबार मतदार 

दक्षिण मुंबई -  ५०५६५ दुबार मतदार

नाशिक -  ९९६७३ दुबार मतदार 

मावळ -  १४५६३६ दुबार मतदार

MNS MVA Morcha Live Updates: आणखी एक वर्ष गेलं तर काय फरक पडतो? - राज ठाकरे

सर्व पुरावे देऊनही जानेवारीमध्ये निवडणुका घेण्याचा हट्ट सुरु आहे. पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत तर आणखी एक वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत तर काय फरक पडतो? असा प्रश्न राज यांनी विचारला. 

MNS MVA Morcha Live Updates: मतदार यादी साफ केल्यावरच मतदान घ्या - राज

राज्यातील सत्तारुढ पक्षही बोगस मतदार याद्यांबद्दल बोलत आहेत. मतदार यादी साफ केल्यानंतरच मतदान घ्या, अशी मागणी राज यांनी केली. राज यांनी यावेळी वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची यादी वाचून दाखवली. 

MNS MVA Morcha Live Updates: मुंबईत 'सत्याचा मोर्चा', राज ठाकरेंचं भाषण सुरु, वाचा मोठे मुद्दे

मुंबईतील सत्याचा मोर्चा पार पडतोय. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण सुरु झाले आहे. निवडणुका घेण्याची घाई का करता असा प्रश्न त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला विचारला.

MNS MVA Morcha LIVE Updates: मुंबईतील मोर्चाला सुरुवात, पाहा लाई्व्ह अपडेट्स

मुंबईमध्ये निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीने काढलेल्या सत्याचा मोर्चाला सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. 

MNS MVA Morcha LIVE Updates: मुंबईतील मोर्चाला सुरुवात, पाहा लाई्व्ह अपडेट्स

मुंबईमध्ये निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीने काढलेल्या सत्याचा मोर्चाला सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. 

MNS MVA Morcha LIVE Updates: उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला, थोड्याच वेळात होणार मोर्चाला सुरुवात

मुंबईमधील सत्याचा मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरेही चर्चगेट परिसरात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंचा ताफा मेट्रो सिनेमाच्या इथून राज ठाकरेंच्या दिशेकडे रवाना झाला आहे. थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

MNS MVA Morcha LIVE Updates: उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन रवाना, मोर्चामध्ये सहभागी होणार

मुंबईतील मोर्चासाठी राज ठाकरे हे  हॉटेलवर दाखल झाले आहेत. तर आता उद्धव ठाकरेही मातोश्रीवरुन रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात महाविकास आघाडीचा विराट मोर्चा निघणार आहे. 

MNS MVA Morcha LIVE Updates: राज ठाकरेंनी लोकलचे तिकीट काढून केला प्रवास

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रीतसर तिकीट काढून लोकल ट्रेन ने प्रवास. 

मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंच्या प्रवासासाठी आधीच जवळपास 50 तिकीट काढण्यात आली होती.

सर्व तिकीट फर्स्ट क्लास ची काढण्यात आली होती. 

महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार संघटनेचे प्रमुख जितू पाटील यांच्या वरती रेल्वे तिकिटांची जबाबदारी देण्यात आली होती.

MNS MVA Morcha LIVE Updates: नवी मुंबईतून महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा मुंबईकडे रवाना

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असतानाच मतदार यादीतील घोळ आणि दुबार नोंदीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.

 या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतून जवळपास ३ हजार कार्यकर्ते आणि नागरिक “सत्याचा मोर्चा” काढण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

राज्यभरातील विविध पक्षांचे नेते गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक आयोगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. दुबार मतदार नोंदी, चुकीचे पत्ते आणि मतदारांची गैरहजेरी यासारख्या गंभीर तक्रारी असूनही, “निवडणूक आयोगाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे”, अशी तीव्र टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

MNS MVA Morcha LIVE Updates: मनसैनिकांनी जाळल्या निवडणूक याद्या

मोर्चासाठी निघण्यापूर्वी घाटकोपर मध्ये मनसैनिकांनी निवडणूक याद्या जाळल्या आहेत. घाटकोपर चे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सचिव अभिषेक सावंत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी निवडणूक आयोगाच्या निषेध करण्यात आला. आज यादी जाळून निषेध केला आहे, पुढे हे आंदोलन आणखी तीव्र करू अशी प्रतिक्रिया या वेळी अभिषेक सावंत यांनी दिली.

MNS MVA Morcha LIVE Updates: राज ठाकरे चर्चगेट स्टेशनवर दाखल, स्वागतासाठी मोठी गर्दी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चर्चगेट स्थानकावर दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. थोड्याच वेळात ते मोर्चाच्या ठिकाणी दाखल होतील. 

MNS MVA Morcha LIVE Updates: ‘कारण काय द्यायचं’ यासाठी हा सगळा खटाटोप, मविआच्या मोर्चावरुन टीका

“महाविकास आघाडीला आगामी निवडणुकांमधील पराभवाचे कारण शोधायचे असल्यामुळेच आजचा मोर्चा काढण्यात आला आहे. उद्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ‘कारण काय द्यायचं’ यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे.

दुबार-तिबार नावे वगळण्यासाठी आम्ही अनेक वेळा निवडणूक आयोगाला सांगितले आहे. ही नावे कमी करा, अशी आमची सतत मागणी आहे. पण निवडणुकीच्या काळातच या विषयावर बोलून फक्त संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधक करत आहेत. अशा मोर्चाला राज ठाकरे जात आहेत, याचंही मला आश्चर्य वाटतं, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआवर निशाणा साधला आहे. 

MNS MVA Morcha LIVE Updates:राज ठाकरेंचा लोकलने प्रवास, मोर्चासाठी रवाना

मुंबईतील मोर्चासाठी राज ठाकरे निघाले.. दादरवरुन लोकलने रवाना! 12 नंतर उद्धव ठाकरे मातोश्रीहून मोर्चासाठी रवाना होतील

MNS MVA Morcha LIVE Updates: नाशिकमधून हजारो मनसैनिक मुंबईकडे रवाना

 मुंबईत निघणाऱ्या सत्याच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नाशिक मधून हजारोंच्या संख्येने मनसेचे पदाधिकारी नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. हातात मनसेचे झेंडे,  वाहनांना स्टिकर आणि राज ठाकरे तुम आगे बढोच्या घोषणा देत हे पदाधिकारी निघाले आहेत.. 

MNS MVA Morcha LIVE Updates: नाकर्तेपणाच्या कबुलीचा मोर्चा, भाजपची खोचक टीका

कॅीग्रेसमध्ये कुणी टिकत नाहीये, 

शरद पवार गटात कुणी थांबायला तयार नाही,

राज ठाकरेंचा यशाचा सूर कधीच हरवलाय… 

आणि 

भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उध्दव ठाकरेंनी विश्वास गमावलाय!

अशा, भरकटलेल्या, हतबल नेत्यांचा हा मोर्चा ‘सत्याचा’ नाही …

हा तर अपयशाच्या, 

नाकर्तेपणाच्या कबुलीचा मोर्चा!!

MNS MVA Morcha LIVE Updates: मोर्चा ऐतिहासिक, निर्णायक ठरणार: संजय राऊत

हा मोर्चा ऐतिहासिक.. संजय राऊतांची प्रतिक्रिया

MNS MVA Morcha Live Updates: मुंबईतील मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसैनिक निघाले

 मुंबईत सत्याचा मोर्चा याच्यासाठी विविध भागातून मनसैनिक आणि शिवसैनिक येण्यास सुरुवात झाली आहे... पालघर मधील मनसैनिक ठाकरे बंधूंची एकजूट दाखवणार चित्र घेऊन आले

Listen to the latest songs, only on JioSaavn.com