रात्रीच्या जेवणातील या चुका ठरू शकतात तुमचं वजन वाढण्याचं कारणं...

आपल्यातील अधिकतर लोक वजन वाढू न देणे, शरीर स्वस्थ राहावे आणि हेल्दी लाइफस्टाइल टिकवण्यासाठी प्रयत्न करीत असतात.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई..:

आपल्यातील अधिकतर लोक वजन वाढू न देणे, स्वस्थ शरीर मिळविणे आणि हेल्दी लाइफस्टाइल टिकवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. यासाठी हेल्दी फूड आणि व्यायामाची आवश्यकता असते. मात्र अनेकदा चांगला आहार घेतल्यानंतरही वजन वाढत असतं. असं का होत असावं याचा कधी विचार केला आहे का? या लेखात तुम्हाला याची उत्तरं मिळतील. आम्ही तुम्हाला अशाच (mistakes of lifestyle)  चार चुकांबद्दल सांगणार आहोत. ज्यातून तुमचं वजन वाढू शकतं. 

वजन वाढण्याची कारणं...
जेवल्यानंतर कॉफी पिणं...
काही लोकांना रात्रीचं जेवण झाल्यानंतर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असतं. यामुळे तुमचं वजन वाढू शकतं. याचा झोपेवर वाईट परिमाम होऊ शकतो. यामुळे तुमची झोप अपूर्ण राहते आणि वजन वाढू लागतं. 

Advertisement

हे ही वाचा - तुमच्या मुलांमध्ये हे '5' गुण आहेत? असतील तर तुमचे मूल भविष्यात प्रचंड यशस्वी होईल

ग्रीन टी पिणं...
रात्रीच्या जेवणानंतर काही लोक ग्रीन टी पितात. वजन वाढण्यामागील हेदेखील एक कारण आहे. कारण ते पचनसंस्थेला आवश्यक पोषक द्रव्ये शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करतात. 

Advertisement

Advertisement

हे ही वाचा - Weight Loss: वजन होईल पटापट कमी, पोटही होईल सपाट; नियमित केवळ करा हे एकच काम

जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं...
पाणी पिणं तशी चांगली बाब आहे. मात्र रात्री जेवल्याच्या लगेचच पाणी पिणे वजन वाढण्यामागील कारण ठरू शकतं. 

व्यायाम करणे...
व्यायाम शरीरासाठी चांगला असतो आणि वजन कमी करण्यासाठी मोदी मदत होते. मात्र रात्रीच्या जेवणानंतर लगेचच व्यायाम केल्याने वजन आरोग्यासाठी आणि वजन नियंत्रणासाठी अनुकूल नाही.