जाहिरात

Diwali Offers : खुशखबर! सर्वांचा फेव्हरेट 'हा' iphone झाला 45 हजारांनी स्वस्त, बंपर सेलमध्ये एकदाच आपटले भाव

Iphone16e Special Offer : आयफोन लव्हर्ससाठी फेस्टिव्ह सीजनमध्ये एक सुवर्ण संधी आहे. दिवाळीचा मुहूर्त खास बनवण्यासाठी ऑफर्सचं सेल लावण्यात आलं आहे.

Diwali Offers : खुशखबर! सर्वांचा फेव्हरेट 'हा' iphone झाला 45 हजारांनी स्वस्त, बंपर सेलमध्ये एकदाच आपटले भाव
iphone 16e Diwali Offers
मुंबई:

Iphone16e Special Offer : आयफोन लव्हर्ससाठी फेस्टिव्ह सीजनमध्ये एक सुवर्ण संधी आहे. लेटेस्ट आयफोनवरही मोठी सूट मिळत आहे. काही दिवसांपूर्वी फ्लिपकार्ट आणि एमेझॉनवरही सेल लावण्यात आला होता. या सेलमध्ये अनेक लोक आयफोन खरेदी करायला विसरले. पण अजूनही उशिर झाला नाहीय. आजही तुम्ही आयफोन स्वस्तात खरेदी करू शकता. ई-कॉमर्स वेबसाईटवर दिवाळीचा मुहूर्त खास बनवण्यासाठी ऑफर्सचं सेल लावण्यात आलं आहे. आज आम्ही तुम्हाला iphone16e वर मिळणाऱ्या ऑफर्सबाबत सांगणार आहोत. या फोनला 45 हजार रुपयांपेक्षाही कमी पैशात खरेदी करू शकता. ही ऑफर अमॅझॉन किंवा फ्लिपकार्टवर नाही, तर रिलायन्स डिजिटलवर (Reliance Digital) आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

आयफोन 16e स्मार्टफोनची किंमत 59900 रुपयांपासून सुरु आहे.तर रिलायन्स डिजिटलवर हा फोन आता 47990 रुपयांपासून मिळत आहेत. एव्हढच नाही, तर ICICI बँक कार्डवर 3000 रुपयांचं डिस्काऊंटही आहे. याचा अर्थ असा आहे की, या फोनला 44990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही एक चांगली ऑफर आहे. 

नक्की वाचा >> सावधान! समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय? मग 'हा' व्हिडीओ एकदा बघाच

काय आहेत या फोनचे दमदार फिचर्स?

अॅपलच्या या स्मार्टफोनमध्ये तीन स्टोरेज व्हेरिएंट येतात.बेस व्हेरिएंटमध्ये 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. दुसरं व्हेरिएंट 256GB स्टोरेजसोबत येतं. तर, तिसरं व्हेरिएंट 512GB स्टोरेजसह मिळतं. याशिवाय, फोनमध्ये 6.1 इंचचा Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन IP68 रेटिंगसोबत येतो. अॅपलच्या या फोनमध्ये A18 चिपसेटही मिळतं. 

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 48MP चा मेन कॅमेरा मिळतो. याचसोबत या मोबाईलमध्ये 12MP चं टेलीफोटो लेंसही मिळतं.चार्जिंगसाठी यामध्ये USB Type-C पोर्ट देण्यात आलं आहे. फोनमध्ये 4005mAH बॅटरीही उपलब्ध आहे.रिअर कॅमेरासाठी फोनमध्ये स्मार्ट HDR5,सफायर क्रिस्टल लेन्स कव्हर, डीप फ्यूजन, सहा इफेक्टसोबत पोर्ट्रेट लायटिंग, नाईट मोड, ऑटो इमेज स्टॅबिलायजेशनसारखे फिचर्स मिळतात. 

नक्की वाचा >> 'कोणत्या खेळाडूंना जास्त संधी..', NDTV वर्ल्ड समिट 2025 मध्ये अजित अगरकरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

Listen to the latest songs, only on JioSaavn.com