जाहिरात

Burning Truck Accident Video : सावधान! समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय? मग 'हा' व्हिडीओ एकदा बघाच

Samruddhi Highway Burning Truck Video : समृद्धी महामार्गावर नागपूरकडे जाणाऱ्या मार्गिकेवर धावत्या ट्रकला मोठी आग लागल्याची घटना घडली. या महामार्गावर बर्निंग ट्रकची थरारक घटना घडली आहे.

Burning Truck Accident Video : सावधान! समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय? मग 'हा' व्हिडीओ एकदा बघाच
Samruddhi Highway Truck Accident Video
मुंबई:

Samruddhi Highway Burning Truck Video : समृद्धी महामार्गावर नागपूरकडे जाणाऱ्या मार्गिकेवर धावत्या ट्रकला मोठी आग लागल्याची घटना घडली. या महामार्गावर बर्निंग ट्रकची थरारक घटना घडली आहे. शहापूर तालुक्यातील समृद्धीच्या शिरोळ बोगद्याजवळ या ट्रकला आग लागल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर 650 वर या ट्रकला आग लागली. या ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी समृद्धी महामार्गाच्या व शहापूर नगरपंचायत अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. या ट्रकच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडलं?

दरम्यान, अग्निशमन दलाकडून ट्रकला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ट्रकला आग लागल्याने 
नागपूरच्या दिशेने जाणारी समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील समृद्धीच्या शिरोळ बोगद्याजवळ एका ट्रकला भीषण आग लागली. ट्रकला अचानक आग लागल्याने महामार्गावर काही काळासाठी वाहतुकीचा खोळंबा उडाला होता. ट्रकला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि पाण्याच्या फवाऱ्याने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नक्की वाचा >> 'कोणत्या खेळाडूंना जास्त संधी..', NDTV वर्ल्ड समिट 2025 मध्ये अजित अगरकरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

इथे पाहा बर्निंग कारचा थरारक व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, या ट्रकचे टायर्सही जळून खाक झाले आहेत. ट्रकला मोठी आग लागल्याने या वाहनाचं मोठं नुकसान झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ज्या ठिकाणी ट्रकला अपघाता झाला, तिथे पिवळ्या रंगाचे बॅरिकेड्स लावून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली. महामार्गावरच ट्रकमध्ये अग्नितांडव झाल्याने धुराचे लोळ आकाशात बाहेर पडत असल्याचंही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातामुळे इतर वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, चालकांनी समृद्धी महामार्गावरून वाहन चालवताना वाहतूक नियमांचं पालन करावं, अशा सूचना पोलिसांनी प्रवाशांना दिल्या आहेत. 

नक्की वाचा >> धावत्या लोकलवर दगड फेकणाऱ्या महिलेचा पर्दाफाश..व्हायरल Video मुळे सत्य आलं समोर, प्रवाशांमध्ये संतापाची लाट!

Listen to the latest songs, only on JioSaavn.com