आयफोन घेण्यासाठी इच्छुक असाल तर अगदी स्वस्तात हा फोन खरेदीची संधी आहे. आयफोन 16 निम्म्या किमतीत खरेदी करता येणार आहे. खास ऑफरनुसार 79,900 रुपयांचा फोन अवघ्या 35,500 रुपयांचा खरेदीची संधी आयफोन प्रेमींसाठी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑनलाईन शॉपिंग साईट्स किंवा रिटेल शॉपमध्ये या संधीचा लाभ घेता येणार आहे. आयफोन 16 ची सध्याची किंमत 79900 रुपये आहे. मात्र अनेक डिस्काऊंट आणि कॅशबॅक अॅड करुन हा फोन अवघ्या 35500 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
(नक्की वाचा- Smartwatch Feature: स्मार्टवॉच सोडवणार सिगारेट ओढण्याचं व्यसन, काय आहे नवी टेक्नोलॉजी?)
काय असेल डिस्काऊट?
- किंमत- 79900 रुपये
- स्पेशल डिस्काऊंट- 8000 रुपये
- ICICI, Kotak Mahindra, SBI क्रेडिट कार्डवर कॅशबॅक- 4000 रुपये
- जुना मोबाईलची किंमत- 18,901 रुपये
- एक्सचेंज बोनस- 8000 रुपये
- अॅक्सेसरीज बेनिफिट- 5490
असे सर्व डिस्काऊंटसह आयफोन 16 हा फोन ग्राहकांना 35,509 रुपयांना मिळणार आहे.
(नक्की वाचा- Android युजर्ससाठी Google चा अलर्ट! तुमचा फोन हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी काय कराल?)
आयफोन 16 चे फीचर्स
Apple iPhone 16 मध्ये Apple Intelligence, मोठा डिस्प्ले आणि कॅमेरा कंट्रोलसह अनेक नवीन फीचर्स आहेत. आयफोन सीरिजमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले आकार 6.3 इंच आणि 6.9 इंच आहे. iPhone 16 सीरिजमध्ये 2X टेलिफोटो झूम असलेला नवीन 48-मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आणि लो लाईटमध्या चांगल्या परफॉर्मन्ससाठी f/1.6 अपार्चर आहे. त्याचा 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील चांगला आहे. जो शार्प, ब्राईट फोटोंसाठी 2.6 पट अधिक लाईट देतो.