जाहिरात

Android युजर्ससाठी Google चा अलर्ट! तुमचा फोन हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी काय कराल?

Google warns Android Users : जानेवारीच्या अपडेटमध्ये ओळखल्या गेलेल्या असुरक्षित गोष्टींना  CVE-2024-43096, CVE-2024-43770, CVE-2024-43771, CVE-2024-49747, आणि CVE-2024-49748 हे कोड देण्यात आले आहेत. 

Android युजर्ससाठी Google चा अलर्ट! तुमचा फोन हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी काय कराल?

गुगलने लाखो अँड्रॉइड यूजर्ससाठी सिक्युरिटी अलर्ट जारी केला आहे. Android 12 ते Android 15 व्हर्जनवर चालणाऱ्या डिव्हाइससाठी हा अलर्ज जारी करण्यात आला आहे. Google ने म्हटलं की सिस्टममध्ये काही लूप होल आहेत, जे हॅकर्सना डिव्हाइसमध्ये प्रवेश मिळवण्यास मदत करू शकतात. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धोका टाळण्यासाठी युज्रर्सना शक्य तितक्या लवकर लेटेस्ट सिक्युरिटी पॅचसह त्यांचे डिव्हाइस करणे आवश्यक आहे. गुगलने आपल्या जानेवारीच्या अँड्रॉइड सिक्युरिटी बुलेटिनमध्ये युजर्सना एक अलर्ट जारी केला आहे. 

(नक्की वाचा-  Smartwatch Feature: स्मार्टवॉच सोडवणार सिगारेट ओढण्याचं व्यसन, काय आहे नवी टेक्नोलॉजी?)

Android 12 ते Android 15 व्हर्जनवर चालणारे डिव्हाइस हॅकर्सच्या टार्गेटवर असू शकतात. काही लुप होलचा शोध लागला आहे, जे गंभीर आहेत. कारण ते सायबर गुन्हेगारांना परवानगीशिवाय डिव्हाइसमध्ये प्रवेश मिळू शकतो. असे झाल्यास, हॅकर्स युजरच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश करु शकतात आणि त्यांची वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते.

जानेवारीच्या अपडेटमध्ये ओळखल्या गेलेल्या असुरक्षित गोष्टींना  CVE-2024-43096, CVE-2024-43770, CVE-2024-43771, CVE-2024-49747, आणि CVE-2024-49748 हे कोड देण्यात आले आहेत. 

(नक्की वाचा-  जोडप्यांमध्ये वेगानं लोकप्रिय होत असलेला Sleep Divorce काय आहे? त्याचा रिलेशनशिपवर काय परिणाम होतो?)

सुरक्षेसंबंधित धोके टाळण्यासाठी Google अनेकदा तुमच्या डिव्हाइसला लेटेस्ट सिक्युरिटी पॅचसह अपडेट करण्याचा सल्ला देते. तुमच्याकडे कोणत्याही ब्रँडचा Android डिव्हाइस असेल तर तो OEM द्वारे जारी केलेल्या लेटेस्ट सिक्युरिट पॅचसह अपडेट केले पाहिजे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com