IAS-IPS होण्यासाठी UPSC ची परीक्षा हिंदी भाषेत देऊ शकता का? 99.99 टक्के लोकांना माहितीच नाही

या परीक्षेबाबत अनेक विद्यार्थांचा भाषेबाबत नेहमीच गोंधळ उडालेला असतो. यूपीएससीची परीक्षा हिंदी भाषेत देता येते  का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

जाहिरात
Read Time: 2 mins
Upsc exam in hindi

UPSC Exam GK News In Marathi : देशातील सर्वात महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या पदांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून UPSC परीक्षा घेतली जाते. त्यामुळे लाखो तरुण या अत्यंत प्रतिष्ठित नागरी सेवा म्हणजे IAS,IPS आणि IFS मध्ये जाण्याचं स्वप्न पाहतात. पण या परीक्षेबाबत अनेक विद्यार्थांचा भाषेबाबत नेहमीच गोंधळ उडालेला असतो. यूपीएससीची परीक्षा हिंदी भाषेत देता येते  का? असा प्रश्न अनेकांना पडतो. विशेषतः जे विद्यार्थी हिंदी माध्यमातून शिक्षण घेतात किंवा ज्यांना या परीक्षेची सखोल माहिती नसते, ते अनेकदा या संभ्रमात असतात की, भाषेमुळं त्यांना परीक्षेची तयारी आणि निवड प्रक्रियेत अडथळा निर्माण होईल का, अशावेळी हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते की UPSC हिंदी माध्यमातील उमेदवारांना कोणत्या सुविधा आणि पर्याय उपलब्ध करून देते.

UPSC मध्ये हिंदी माध्यमाचा पर्याय

केंद्रीय लोकसेवा आयोग देशभरातील उमेदवारांना समान संधी देण्याच्या उद्देशाने परीक्षेत भाषेचे अनेक पर्याय उपलब्ध करून देतो. विद्यार्थी प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीमध्ये हिंदीला माध्यम म्हणून निवडू शकतात. प्रश्नपत्रिका सामान्यतः हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. तसच विद्यार्थी मुख्य परीक्षेतील उत्तरे  निवडलेल्या भाषेत लिहू शकतात.म्हणजेच, एखादा उमेदवार हिंदी माध्यमातून आहे किंवा हिंदे भाषेवर त्याचं प्रभुत्व आहे, अशा परिस्थितीत तो संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत हिंदीला त्याची मुख्य भाषा म्हणून निवडू शकतो. 

नक्की वाचा >> 15 आठवड्यांत केलं 22 किलो वजन कमी, घरीच बनवा 'ही' Fat Loss सुपर ड्रिंक, फिटनेस ट्रेनरने शेअर केला व्हिडीओ

मुलाखतही हिंदी भाषेत शक्य

UPSC केवळ लेखी परीक्षेतच नाही,तर मुलाखतीदरम्यानही भाषेचा पर्याय उपलब्ध करून देते. विद्यार्थी मुलाखतीतही हिंदी भाषा निवडू शकतात. जर विद्यार्थ्यांना भाषिक मदतीची गरज भासली,तर आयोग इंटरप्रेटरची सुविधा देखील उपलब्ध करून देतो.यामुळे संवादात कोणताही अडथळा येत नाही.या व्यवस्थेचा उद्देश असा आहे की भाषा कोणत्याही विद्यार्थ्याची गुणवत्ता,अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी करण्यात अडथळा निर्माण करत नाही.

नक्की वाचा >> GK News: महाराष्ट्राच्या जवळच आहे भारतातील 9 राज्यांपेक्षाही मोठा जिल्हा, इथेच वसलंय जगातील सर्वात श्रीमंत गाव

तयारी कशी करावी?

आज हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके,चालू घडामोडींची सामग्री आणि ऑनलाइन अभ्यास साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.जुन्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या सेंट्सचा सराव करून लेखनकौशल्य सुधारता येते. UPSC मधील यश भाषेवर नाही,तर शिक्षण, विश्लेषण आणि सादरीकरणाच्या क्षमतेवर अवलंबून असते.

Advertisement