- भेंडीमध्ये सॉल्युबल फायबर आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर ठरते
- सॉल्युबल फायबरमुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखते
- कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या अन्नामुळे शरीरात ऊर्जा हळूहळू सोडली जाते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते
Okra for Diabetes Management: आजच्या काळात डायबिटीज या आजाराची समस्या जगभरात झपाट्याने वाढणाऱ्या आरोग्य समस्यांपैकी एक बनली आहे. विशेषतः टाइप 2 मधुमेहाबद्दल बोलायचे झाले, तर यामुळे शरीर रक्तातील साखरेचा योग्य पद्धतीने वापर करू शकत नाही. याच कारणामुळे रक्तातील साखरेची पातळी (Sugar Level) वाढू लागते. मधुमेहाच्या विळख्यात आल्यानंतर व्यक्तीला आयुष्यभर आपला आहार आणि जीवनशैलीची योग्य पद्धतीने काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. डॉक्टर देखील मधुमेहाच्या रुग्णांना खाण्यापिण्यात पथ्य पाळण्यास सांगतात. कारण हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी केवळ औषध आणि व्यायामच नाही, तर व्यक्तीचा आहारही महत्त्वाची भूमिका बजावतो.
पण तुम्हाला माहिती आहे का, की तुमच्या फ्रिजमध्ये असलेली एक भाजी ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते? हो हे खरंय. न्युट्रिशनिस्ट दीपाक्षी जैन यांनी आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत भेंडीची भाजी खाण्याचे फायदे सांगितले आहेत.
न्युट्रिशनिस्ट दीपाक्षी जैन यांनी शेअर केलेला व्हिडीओ
भेंडीमधील पोषक तत्त्वे
जर तुम्ही भेंडी फक्त चवीसाठी खात असाल, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की भेंडीमध्ये अनेक प्रकारच्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. भेंडीतील सॉल्युबल फायबर आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स (Low GI) हे गुणधर्म मधुमेहींसाठी फायदेशीर असतात. यामुळे मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकत नसला तरीही डाएटमध्ये भेंडीचा समावेश केल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतील.
मधुमेहींना कसा होईल फायदा?
भेंडीमध्ये सॉल्युबल फायबर असते, जे पचनप्रक्रिया थोडीशी संथ करते. त्यामुळे भेंडी खाल्ल्यानंतर रक्तामध्ये ग्लुकोज वेगाने पोहोचत नाही. एकूणच भेंडीतील फायबर साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून (शुगर स्पाइक) रोखण्यास मदत करू शकते. यासोबतच भेंडीचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) स्तरही कमी मानला जातो. कमी GI असलेले अन्नपदार्थ शरीरात ऊर्जा हळूहळू सोडतात, ज्यामुळे शरीरातील ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
(नक्की वाचा : Von Willebrand Disease: महिलांनो सावधान! किरकोळ दुखापतीनंतरही रक्त थांबत नाहीय? तर असू शकतो हा धोकादायक आजार)
शरीरासाठी फायबर महत्त्वाचे का असते?
मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन फायदेशीर मानले जाते, कारण यामुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते. भेंडीमध्ये असलेले फायबर आतड्यांमध्ये साखरेच्या शोषणाच्या वेगावर परिणाम करू शकते, ज्यामुळे शरीराला ग्लुकोज हाताळण्यासाठी अधिक वेळ मिळतो.
भेंडी खाण्याची योग्य पद्धत काय आहे?
जर तुम्ही आरोग्यवर्धक फायद्यांसाठी भेंडी खात असाल, तर ती खूप जास्त तेल किंवा मसाल्यांमध्ये शिजवून खाऊ नका. त्याऐवजी तुम्ही ती हलकीशी उकळून किंवा कमी तेलात शिजवून खाऊ शकता.
केवळ भेंडी खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित होईल का?
नाही, केवळ भेंडी खाल्ल्याने तुमची मधुमेहाची समस्या नियंत्रित होण्यास मदत मिळणार नाही. यासोबतच तुम्हाला संतुलित आहार, रोज व्यायाम, पुरेशी झोप आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
(नक्की वाचा : Frequent Urination: सतत लघवीला होतेय? गंभीर आजाराचा धोका वेळीच ओळखा, अन्यथा 1 चूक तुम्हाला ICUमध्ये पोहोचवेल)
दीपाक्षी जैन (न्युट्रिशनिस्ट)
शिक्षण: ग्लोबल पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन (UK) आणि नॅशनल डायबिटीज एज्युकेटर
विशेषज्ञता (स्पेशलायझेशन): गट हेल्थ (पोटाचे आरोग्य) | PCOS | T2 डायबिटीज (टाइप 2 मधुमेह) | वेट लॉस (वजन कमी करणे)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )