जाहिरात

Top Floor Cooling Tips In Summer: घरात AC नाहीय? कडक उन्हातही छत थंड ठेवायचंय? स्वस्तात करा 4 सोपे उपाय

How To Reduce Roof Heat Naturally: उन्हाळ्यात इमारतीचे छप्पर भट्टीसारखे तापल्यामुळे वरच्या मजल्यावरील खोल्यांमध्ये राहणे असह्य होते. 4 सोपे घरगुती उपाय नक्की करून पाहा. सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

Top Floor Cooling Tips In Summer: घरात AC नाहीय? कडक उन्हातही छत थंड ठेवायचंय? स्वस्तात करा 4 सोपे उपाय
"Summer Cooling Tips: उन्हाळ्यात घराचे छत भट्टीसारखे तापतंय?"
Canva
  • उन्हाळ्यात घराचे छप्पर सूर्याच्या थेट किरणांमुळे तापते आणि खोलीतील तापमान वाढते
  • RCC किंवा काँक्रिटचे छप्पर उष्णता शोषून ठेऊन रात्रीही खोली गरम ठेवते
  • छप्पर थंड ठेवण्यासाठी त्यावर पांढऱ्या रंगाचा हीट रिफ्लेक्टिव्ह पेंट लावल्यास तापमान कमी होते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

4 Natural Cooling Tips For Home And Roof: वातावरणात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कडक ऊन आणि उष्ण लाटांमुळे नागरिक वैतागले आहेत. घराबाहेर पडले तर अंगाची लाहीलाही होत आहे आणि बाहेरुन घरात आल्यानंतर उन्हाने तापलेल्या छतामुळे अधिकच अस्वस्थ व्हायला होत आहे. उन्हाळा सुरू होताच घराचे छत तापणे ही सर्वात मोठी समस्या असते. घराचे छप्पर भट्टीसारखे तापते. तुम्ही देखील इमारतीत सर्वात वरच्या मजल्यावर राहत असाल तर दिवसा खोलीत बसणेही अशक्य होऊन जाते. अशा वेळी पंखा देखील गरम हवा फेकू लागतो आणि एसी-कुलरमुळेही फारसा बदल जाणवत नाही. 

घरासह छतासाठी 4 नॅचरल कुलिंग टिप्स 

कडक उन्हामध्ये घर थंड ठेवणे शक्य आहे. छोटे छोटे उपाय केल्यास तुमचे घर थंड राहण्यासोबतच विजेचे बिलही जास्त येणार नाहीत. उन्हाळ्यात घरात गारवा टिकून राहावे, यासाठी वाचा सविस्तर...

उन्हाळ्यात छप्पर भट्टीसारखे का तापते? 

उन्हाळ्यात सर्वात जास्त फटका घराच्या छताला बसतो, कारण ते दिवसभर थेट उन्हाच्या संपर्कात असते. छतावर पडणारे कडक ऊन आणि उष्ण वारे यामुळे छत भट्टीसारखे तापते. यामागील कारणे जाणून घेऊया...

1. थेट ऊन (Solar radiation): छप्पर सूर्याची किरणे थेट शोषून (absorb) घेते, ज्यामुळे त्याच्या पृष्ठभागाचे तापमान हवेच्या तापमानापेक्षा कित्येक पटीने वाढते.

2. काँक्रिटचे वैशिष्ट्य: बहुतांश घरांची छतं आरसीसी (RCC) किंवा काँक्रिटची असतात, जी उष्णता साठवून ठेवतात आणि नंतर ती हळूहळू बाहेर सोडतात.

3. लो रिफ्लेक्टिव्हिटी (Dark surface): सामान्य स्वरुपातील छत उन्हाचे परावर्तन (reflect) करत नाही, उलट ते उष्णता शोषून घेते, ज्यामुळे उष्णता आणखी वाढते.

4. रात्रीही छत थंड न होणे: दिवसभर जमा झालेली ही उष्णता रात्री खालील खोल्यांमध्ये फेकली जाते, त्यामुळे रात्रीही गरम होत राहते.

(नक्की वाचा : Cooling Tips : AC चं बिल झिरो होणार! गच्चीवरच्या या साध्या युक्तीने अख्खं घर राहील फ्रिजसारखं कूल)

एसी (AC) शिवाय देखील घर राहील थंड, फक्त करा हे 4 सोपे उपाय

छप्पर थंड ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा | Follow these steps to cool your house roof

1. पांढरा रंग

घराचे छप्पर थंड ठेवण्यासाठी तुम्ही त्यावर पांढऱ्या (White) रंगाचा 'हीट रिफ्लेक्टिव्ह पेंट' (Cool Roof Paint) किंवा वॉटरप्रुफिंग कोटिंग करू शकता. हे छतावर पडणारे कडक ऊन रोखते, ज्यामुळे छप्पर आणि खोल्या कमी प्रमाणात उष्ण होतात.

(नक्की वाचा : Excessive Sweating Causes: उन्हाळ्यात जास्त घाम येतोय? थकवाही जाणवतोय? या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वाच डॉ. पै यांनी दिलेली माहिती)

2. ग्रीन नेट (हिरवी जाळी)

कडक उन्हात जेव्हा एसी देखील फेल होतो, तेव्हा तुम्ही तुमच्या छतावर हिरव्या रंगाच्या जाळ्या (Green Net) लावू शकता. हे सूर्याची थेट किरणे छतावर पडण्यापासून रोखते. हे लावल्यामुळे छताचा पृष्ठभाग तापत नाही आणि खालील खोलीत उष्णतेची जाणीव कमी होते.

chhat thanda rakhne ka tarika, roof cooling tips summer India, nautapa summer tips, how to reduce roof heat naturally, summer cooling tips India, bina AC ghar thanda kaise rakhein, cool roof paint kya hota hai, terrace garden benefits summer, green net roof heat solution, desi jugaad cooling tips, छत को ठंडा रखने के घरेलू उपाय, 45°C में घर को ठंडा कैसे रखें, नौतपा में गर्मी से कैसे बचें, roof heat reduction tips without AC, cheap home cooling ideas India,

3. टेरेस गार्डन (छतावरील बाग)

छप्पर थंड ठेवण्यासाठी तुम्ही त्यावर रोपांच्या कुंड्या ठेवू शकता. माती आणि वनस्पतींमुळे छतावर उन्हाचा थेट परिणाम कमी होतो. जेव्हा तुम्ही वनस्पतींना पाणी घालता, तेव्हा बाष्पीभवनामुळे (Evaporation) छप्पर आपोआप थंड होते.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

4. जुटचे गोणपाट

हा एक अतिशय स्वस्त जुगाड आहे. संध्याकाळच्या वेळी छतावर जुटचे गोणपाट अंथरून द्या. त्यावर हलके पाणी शिंपडा, यामुळे छतावरील उष्णता शांत होईल आणि रात्री खोली पूर्णपणे थंड राहील.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com