Tadgola: उन्हाळ्यात ताडगोळे खाल्ल्यास काय होते? कधी खावे आणि कोणी खाऊ नये? डॉ रुचा यांनी दिली मोठी माहिती

Tadgola Summer Fruit: उन्हाळ्यात ताडगोळे खाल्ल्यास काय होते? जाणून घेऊया डॉ. रुचा पै यांनी फळातील आयुर्वेदिक गुणधर्म आणि सेवनाची योग्य वेळ याबाबत दिलेली सविस्तर माहिती.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Tadgola Summer Fruit: ताडगोळे खाण्याचे फायदे"
Canva

Tadgola Summer Fruit: उन्हाळ्याचा कडाका वाढला की शरीराची लाहीलाही व्हायला लागते. अशा वेळी बाजारात दिसणारे पारदर्शक आणि थंडगार ताडगोळे केवळ डोळ्यांनाच नाही, तर शरीरालाही कमालीचा थंडावा देतात. उन्हाळ्यातील हे एक नैसर्गिक 'सुपरफूड' असून आरोग्यासाठी त्याचे आरोग्यदायी फायदेही असंख्य आहेत. याबाबत आयुर्वेदिक डॉ. रुचा पै यांनी दिलेली महत्त्वाची माहिती सविस्तर स्वरुपात जाणून घेऊया...

शरीराची उष्णता कमी करण्यासाठी ताडगोळे खाणे सर्वोत्तम पर्याय

वाढत्या तापमानामुळे सध्या नागरिक हैराण झाले आहेत. घामामुळे होणारी चिडचिड, डिहायड्रेशन आणि पित्ताचा त्रास यावर उपाय म्हणून अनेकजण शीतपेयांकडे वळतात. पण निसर्गाने आपल्याला ताडगोळा (Ice Apple) या फळाच्या रूपाने एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय दिला आहे. ताडाच्या झाडावर येणारे हे फळ उन्हाळ्यात शरीरातील उष्णता शोषून घेण्याचे काम करते.

Advertisement

आयुर्वेदिक दृष्टिकोनातून ताडगोळ्याचे महत्त्व

ताडगोळा हे ताडाच्या झाडावर येणारे, शरीराला थंडावा देणारे फळ आहे. इंग्रजीमध्ये ताडगोळ्याला 'Ice Apple' किंवा 'Palmyra Fruit' असे म्हणतात. महाराष्ट्रात विशेषतः उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी हे फळ खूप उपयोगी मानले जाते. 

(नक्की वाचा:  Sapota Benefits: फक्त चवीलाच नाही, तर 'हे' स्वस्त फळ हृदयासाठी आहे वरदान; आयुष मंत्रालयानेही दिला सल्ला)

ताडगोळ्यातील आयुर्वेदिक गुणधर्म 

आयुर्वेदानुसार ताडगोळा हा अत्यंत 'शीतल' म्हणजेच थंड प्रवृत्तीचा मानला जातो. हे फळ 'पित्तशामक' असून शरीरातील वाढलेली उष्णता, जळजळ आणि तृष्णा (तहान) कमी करण्यास मदत करते. पचायला हलके (लघु) असल्याने उन्हाळ्यात जेव्हा आपली पचनशक्ती मंदावते, तेव्हा हे फळ वरदान ठरते.

(नक्की वाचा: Kidney Detox Drinks: घरच्याघरीच किडनी डिटॉक्स करण्यासाठी डाएटमध्ये 5 ड्रिंक्सचा करा समावेश, हे होतील परिणाम?)

ताडगोळे खाण्याचे फायदे | Tadgola Benefits
  • शरीराला थंडावा मिळतो: उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यास ताडगोळ्यामुळे मदत मिळते.
  • डिहायड्रेशनची समस्या टळते: ताडगोळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील द्रव संतुलित ठेवण्यास मदत मिळते.
  • अ‍ॅसिडिटी कमी होण्यास, पित्त वाढल्यामुळे होणारी जळजळ शांत होण्यास मदत मिळते.
  • त्वचेसाठी उपयोगी : उष्णतेमुळे होणारी त्वचेची जळजळ रॅशेज कमी होण्यास मदत मिळते.
  • पचनास हलके फळ: उन्हाळ्यात भूक कमी असताना हलका आणि ताजेतवाने करणारे फळ

ताडगोळे कधी आणि कोणी खावे?

  • ताडगोळे खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळ किंवा दुपार. 
  • रात्रीच्या वेळी हे फळ खाणे टाळावे, कारण फळाची प्रवृत्ती अत्यंत थंड असते. 
  • ज्यांना वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास होतो किंवा ज्यांची प्रकृती 'कफ' प्रधान आहे, त्यांनी ताडगोळे मर्यादित प्रमाणात खावे. 

उन्हाळ्यामध्ये कॅफिनयुक्त शीतपेय पिण्याऐवजी निसर्गाचा हा अनमोल ठेवा असलेल्या ताडगोळ्याचा आस्वाद घेणे आरोग्यासाठी नक्कीच हिताचे ठरेल.

Photo Credit: NDTV Marathi


(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)