Pocket AC: एसीची गरज नाही! गळ्यात घाला 'हे' खास डिव्हाइस, उन्हात मिळेल गारेगार अनुभव, पाहा किंमत

हे एक अतिशय लहान आणि हलके डिव्हाइस आहे. हे डिव्हाइस तुम्ही कपड्यांच्या आत मानेच्या जवळ बसवू शकता.

जाहिरात
Read Time: 2 mins

REON Pockect Pro Plus: सध्या वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. घराबाहेर पडल्यावर अंगाची लाहीलाही होते. अशा वेळी एअर कंडिशनर (AC) सोबत घेऊन फिरणे अशक्य असते. हीच अडचण ओळखून जपानची दिग्गज कंपनी सोनीने (Sony) एक भन्नाट तंत्रज्ञान आणले आहे. कंपनीने 'REON Pocket Pro Plus' हे वेअरेबल कूलर लाँच केले आहे. ते गळ्यात घातल्यावर तुम्हाला एसीसारखा थंडावा मिळतो. हे उपकरण प्रामुख्याने मानवी शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. स्मार्ट सेन्सर्सच्या साहाय्याने बाह्य वातावरणातील बदल टिपून हे यंत्र थंडावा प्रदान करते. त्यामुळे सध्या तरी एसीला पर्याय म्हणून त्याकडे पाहीले जात आहे. 

गळ्यात बसणारे छोटे 'एसी'
REON Pocket Pro Plus हे एक अतिशय लहान आणि हलके डिव्हाइस आहे. हे डिव्हाइस तुम्ही कपड्यांच्या आत मानेच्या जवळ बसवू शकता. एकदा सुरू केल्यानंतर हे यंत्र थेट शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास सुरुवात करते. उन्हात फिरताना किंवा प्रवासात असताना हे यंत्र शरीराला थंडावा देऊन उष्णतेचा त्रास कमी करते. त्यामुळे तुम्हाला उन्हाचा मुळीच त्रास होत नाही असा कंपनीचा दावा आहे. लवकरच ते भारतीय बाजारपेठेत येणार आहे. वाढत्या उष्णतेच्या लाटेत हे वैयक्तिक कूलिंग डिव्हाइस भारतीयांसाठी सोयीचे ठरू शकते.

Advertisement

 नक्की वाचा - AC चे बिल येईल अर्धे! फॉलो करा या 5 सोप्या ट्रिक्स, मिनिटांत मिळेल थंडावा अन् वीज बिल येईल कमी

स्मार्ट सेन्सर आणि बॅटरी लाईफ
या गॅजेटमध्ये स्मार्ट सेन्सर्स देण्यात आले आहेत. हे सेन्सर्स तुमच्या आजूबाजूचे तापमान ओळखून कूलिंग लेव्हल आपोआप कमी-जास्त करतात. विशेष म्हणजे, तुम्ही हे डिव्हाइस मोबाईल ॲपद्वारेही नियंत्रित करू शकता. यात कूलिंगसोबतच 'वॉर्म मोड' देखील आहे, जो थंडीच्या दिवसात उपयुक्त ठरतो. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत याची बॅटरी लाईफ सुधारण्यात आली असून, ती जास्त वेळ टिकते.

किंमत आणि उपलब्धता
सध्या हे डिव्हाइस युकेसह काही निवडक देशांमध्ये लाँच करण्यात आले आहे. याची किंमत 199 पाउंड म्हणजेच भारतीय चलनानुसार साधारण 21 ते 22 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. भारतात हे डिव्हाइस अद्याप अधिकृतपणे लाँच झालेले नाही. मात्र, भारतातील वाढती उष्णता पाहता, येथे या उपकरणाला मोठी मागणी मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या जागतिक तापमानाचा फटका सर्वसामान्यांना बसत असताना तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत. याच साखळीत सोनी कंपनीने 'REON Pocket Pro Plus' हे वेअरेबल कूलर जागतिक बाजारपेठेत सादर केले आहे.

नक्की वाचा - 'या' अभिनेत्रीने 16 वर्षानंतर सोडला भारत, देश सोडताच म्हणाली आता इथे घरा सारखं वाटत नाही