"Mango Modak Recipe: आंबा मोदक रेसिपी"
Mango Modak Recipe: आंबे खायला मिळणार म्हणून काहीजणांना उन्हाळा ऋतू आवडतो. उन्हाळा सुरू झाला की आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी देखील घराघरात तयार केल्या जातात किंवा बाजारामध्ये उपलब्ध होतात. आमरस, आंबा पोळी, आंब्याचा शिरा वगैरे वगैरे... पण तुम्ही कधी आंब्याचे मोदक खाल्ले आहेत का? घरच्या घरी आंब्याचे मोदक कसे तयार करावे, जाणून घ्या साधीसोपी रेसिपी...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सामग्री:
तूप, किसलेले ओले खोबरे, आमरस, गूळ, तांदळाचे पीठ, सुकामेवा, वेलचीपूड, पाणी
(नक्की वाचा: Akshaya Tritiya 2025 Recipe: अक्षय्य तृतीया स्पेशल आंब्याची पोळी Recipe Video)
पाककृती:
- एका कढईमध्ये तूप वितळवून घ्या.
- तुपामध्ये किसलेले ओले खोबरे परतून घ्यावे.
- थोड्या वेळाने खोबऱ्यामध्ये आंब्याचा रस मिक्स करावा.
- खोबरे आणि आमरस एकजीव होईपर्यंत सारण ढवळत राहा.
- थोड्या वेळाने सारणामध्ये किसलेला गूळ मिक्स करावा.
- मोदकाचे सारण व्यवस्थित शिजू द्यावे.
- सारणामध्ये सुकामेव्याचे काप मिक्स करा.
- सारण तयार झाल्यानंतर वेलचीपूड मिक्स करावी.
(नक्की वाचा: Mango Benefits: आंबा आरोग्यासाठी चांगला की वाईट? )
मोदकाची उकड तयार करण्याची पद्धत
- एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवा.
- पाण्यामध्ये तूप मिक्स करावे.
- थोड्यावेळाने आमरस देखील मिक्स करावा.
- मिश्रण व्यवस्थित ढवळावे.
- यानंतर उकडीचे पीठ पाण्यात मिक्स करा. पिठाच्या गाठी तयार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
- उकड नीट तयार झाल्यानंतर मळून घ्या.
- यानंतर पारंपरिक पद्धतीने हाताने मोदक तयार करा किंवा साच्याच्या मदतीनेही तुम्ही मोदक तयार करू शकता.
- मोदक तयार झाल्यानंतर वाफेवर शिजवून घ्या.
- गरमागरम मोदकांचा तुपासह आस्वाद घ्यावा.
Video Credit Insta @ Urmila Ambure