
Akshaya Tritiya 2025 Recipe: अक्षय्य तृतीयेचा दिन हिंदू धर्मामधील अतिशय महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. या दिवशी लक्ष्मीमाता आणि धनाची देवता कुबेराची घरोघरी पूजा केली जाते. खास पक्वान्नासह गोड पदार्थांचाही नैवेद्य अर्पण केला जातो. यंदा अक्षय्य तृतीयेनिमित्त तुम्ही आंब्याची पोळी (Mango Poli Recipe) तयार करू शकता. घरच्या घरी कसा तयार करावा हा पदार्थ, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आंबा पोळी तयार करण्यासाठी लागणारी सामग्री (Mango Poli Recipe Ingredients)
सामग्री- गव्हाचे पीठ : दोन कप
- मीठ चवीनुसार
- हळद : 1/4 टीस्पून
- आवश्यकतेनुसार पाणी
- तेल : दोन चमचे
(नक्की वाचा: 30 एप्रिलपासून या तीन राशींचे येणार अच्छे दिन, अक्षय्य तृतीयेला जुळले आले मोठे राजयोग)
पुरण कसे तयार करावे?
- तूप : दोन चमचे
- रवा : एक कप
- दोन आंबे
- साखर : एक कप
- आंब्याचा रस शिजवण्यापुरते दूध
- चिमूटभर मीठ
- वेलची पावडर : अर्धा चमचा
- सूंठ पावडर : 1/4 टीस्पून
- जायफळ पावडर : 1/4 टीस्पून
(नक्की वाचा: Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला सोन्याऐवजी खरेदी करा या 5 गोष्टी, कसा होईल फायदा? वाचा यादी)
कशी तयार करावी आंब्याची पोळी
- एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घ्या
- पिठामध्ये हळद, मीठ, पाणी मिक्स करुन कणीक मळून घ्या.
- तेलाच्या मदतीने कणीक व्यवस्थित मळून घ्यावे.
- 20-30 मिनिटांसाठी कणीक झाकून ठेवा.
यानंतर आंब्याचा गर काढून घ्या आणि मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस तयार करा.
(नक्की वाचा: Happy Akshaya Tritiya 2025 Wishes: घरात नांदो आनंद, लाभो संपत्ती अपार; अक्षय्य तृतीयेच्या पाठवा खास शुभेच्छा)
सारण कसे तयार करावे?
- एका कढईमध्ये दोन चमचे तूप वितळवून घ्या.
- तुपामध्ये रवा परतून घ्यावा. त्यामध्ये आमरस आणि साखर मिक्स करा.
- यानंतर आवश्यकतेनुसार दूध मिक्स करावे.
- चिमूटभर मीठ, वेलचीपूड, सूंठ, जायफळ पावडर देखील मिक्स करा.
- मिश्रणामध्ये दोन चमचे तूप मिक्स करा. मिश्रण शिजण्यासाठी भांड्यावर झाकण ठेवा.
- सारण थोडे थंड होऊ द्यावे. सारण थंड झाल्यानंतर पोळी लाटण्यासाठी घ्यावी.
- पिठाचे गोळे तयार करा आणि त्यामध्ये पुरणपोळीप्रमाणे सारण भरावे.
- पीठ लावून पोळी लाटून घ्यावी.
- पोळी लाटून झाल्यानंतर तव्यावर शेकून घ्या. पोळीवर तेल किंवा तूप लावू शकता.
गरमागरम आंब्याच्या पोळीचा तूप किंवा दुधासह आस्वाद घ्यावा.
पाहा संपूर्ण व्हिडीओ Video Credit Insta @ Bharati Vahagaonkar
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world