On New Year's Eve, Swiggy reported over 2,18,993 biryanis and 90,000 burgers ordered, with comfort foods like upma and khichdi also popular. Bengaluru favored salads, while gulab jamun and chai topped dessert and late-night cravings respectively
New Year Food Trend: नवीन वर्ष 2026 चे स्वागत करताना भारतीय खवय्यांनी ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy वरून खाद्यपदार्थांची तुफान ऑर्डर केली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरात पार्ट्यांचे नियोजन असताना, घराघरातून ऑनलाईन फूड ऑर्डरचा ओघ सुरू होता.
31 डिसेंबरच्या रात्री भारतीयांनी नेमके काय खाल्ले, याचे रंजक आकडे स्विगीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर केले आहेत. अपेक्षेप्रमाणे बिर्याणीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. स्विगीने दिलेल्या रिअल-टाइम अपडेट्सनुसार, 31 डिसेंबर 2025 च्या संध्याकाळपासूनच भारतीयांच्या पसंतीचे खाद्यपदार्थ घराघरात पोहोचू लागले होते.
बिर्याणी ठरली 'क्लिअर विनर'
दरवर्षीप्रमाणे यंदाही बिर्याणीने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. संध्याकाळपर्यंतच स्विगीवर तब्बल 2,18,993 बिर्याणीच्या ऑर्डर्स नोंदवल्या गेल्या होत्या. घरगुती पार्ट्या असोत किंवा शेवटच्या क्षणी केलेले प्लॅन्स, बिर्याणी हा भारतीयांचा सर्वात लाडका पदार्थ ठरला.
(नक्की वाचा- Bed Sheet Cleaning Tips: किती दिवसात बिछान्याची चादर बदलावी? 90 टक्के लोक 'ही' चूक नेहमीच करतात)
बर्गर आणि स्नॅक्सचा कल्ला
फास्ट फूडच्या श्रेणीत बर्गरने आपली मोहिनी कायम ठेवली. रात्रीपर्यंत 90,000 हून अधिक बर्गरची ऑर्डर देण्यात आली. मित्रांसोबत शेअर करण्यासाठी आणि खाण्यास सोपा असल्याने बर्गरला मोठी पसंती मिळाली.
गुलाब जामून आणि गाजर हलवा
पार्टीचा शेवट गोड नसेल तर ती अपूर्ण आहे. म्हणूनच 46,627 गुलाब जामूनच्या ऑर्डर्स रात्री उशीरापर्यंत आल्या. हिवाळ्याचा मोसम असल्याने 7,573 लोकांनी गाजर हलव्याचा आस्वाद घेतला.
काही हटके आणि घरगुती चॉईस
पार्टीच्या गर्दीत काही लोकांनी साधेपणाला पसंती दिली. उपमा 4222, खिचडी 9410 ग्राहकांनी मागवली. तर 29618 कप चहाची ऑर्डर उशीरा रात्री देण्यात आली.