Bed Sheet Cleaning Tips: तुम्ही बिछान्यावरील बेडशीट कितीही दिवस वापरता? किंवा फक्त झोपण्यासाठी वापरत असाल, तर तुम्हाला याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत माहित असलं पाहिजे. बिछानाच्या चादरी आणि उशांच्या कव्हर्स किती वेळा किंवा किती दिवसांनी बदलायला हव्यात? याबाबत अनेकांना माहित नसेल. अनेक लोक घरातील इतर गोष्टींच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष देतो पण चादरी आणि उशांच्या कव्हर्सकडे मात्र दुर्लक्ष करतो.
पण त्वचेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने त्यांची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. जर चादरी वेळोवेळी बदलल्या नाहीत, तर त्यावर घाम, त्वचेचे कण, धूळ आणि बॅक्टेरिया जमा होतात, ज्यामुळे त्वचेच्या समस्या, अॅलर्जी, खाज, श्वास घेण्यास त्रास आणि झोपेच्या गुणवत्तेत घट अशा समस्या उद्भवू शकतात. बिछान्याची चादर किती दिवसांनी बदलायला हवी? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
बिछान्याच्या चादरी किती वेळा बदलायला हव्यात?
तज्ज्ञांच्या मते, बिछान्याच्या चादरी आठवड्यातून एकदा बदलणे सर्वात योग्य मानले जाते. उशांचे कव्हर्स देखील आठवड्यातून एकदा बदलायला हवेत. जर तुम्हाला खूप घाम येत असेल, त्वचेच्या समस्या असतील, अॅलर्जी असेल किंवा पाळीव प्राणी बिछान्यावर येत असतील, तर दर 3 ते 4 दिवसांनी चादरी बदलणे सुरक्षित राहते. याशिवाय, जेव्हा तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला ताप, सर्दी किंवा खोकला असेल, तेव्हा बिछान्याच्या चादरी आणि उशांचे कव्हर्स लवकर बदलणे आवश्यक आहे.
नक्की वाचा >> GK News: महाराष्ट्राच्या जवळच आहे भारतातील 9 राज्यांपेक्षाही मोठा जिल्हा, इथेच वसलंय जगातील सर्वात श्रीमंत गाव
90% लोक कोणती चूक करतात?
चादर बदलताना बहुतांश लोक काही चुका करतात. जसे की 15-20 दिवस किंवा कधी कधी एक महिना चादरी न बदलणे, चादरी फक्त झटकून किंवा उन्हात वाळवून पुन्हा वापरणे, उशांचे कव्हर्स वेळेवर न बदलणे, चादरींना वास येईपर्यंत किंवा डाग पडल्याशिवाय न धुणे इत्यादी. अशा चुका आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
नक्की वाचा >> New Year 2026 Parties: दारूसोबत पाणी मिक्स करावं की नाही? कोणत्या ड्रिंक्स आहेत सर्वात घातक? डॉक्टर सांगतात..
बेडशीट कसे स्वच्छ करावे?
फक्त चादरी बदलणे पुरेसे नाही, त्यांना नीट धुणे तितकेच महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास चादरी गरम पाण्यात धुवा, ज्यामुळे जंतू मरतात. हलके डिटर्जंट वापरा, आणि चादरी नीट वाळवणे खूप गरजेचे आहे. ओल्या चादरींचा वापर करू नका. उन्हात वाळवल्याने नैसर्गिकरित्या जंतू कमी होतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world