Tawa Cleaning Tips: स्वयंपाकघरात दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी तवा ही अतिशय महत्त्वाची वस्तू आहे. पण रोजची पोळी, पराठा किंवा भाजी करताना तेल, तूप आणि पिठाचे थर साचून तवा हळूहळू काळा पडू लागतो. अनेकदा हे डाग इतके चिकट होतात की साध्या साबणाने घासूनही ते निघत नाहीत. शेवटी कंटाळून अनेकजण नवीन तवा विकत घेण्याचा विचार करतात. पण आता काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या घरातील साहित्याचा वापर करून तुम्ही जुना आणि काळाकुट्ट पडलेला तवा पुन्हा नव्यासारखा चमकवू शकता.
तवा काळा आणि चिकट का होतो?
सतत मोठ्या आचेवर स्वयंपाक केल्यामुळे तव्यावर तेल आणि मसाल्यांचे थर साचतात. जर प्रत्येक वापरानंतर तवा नीट स्वच्छ केला नाही, तर हे थर जळून कडक होतात आणि त्याचे रूपांतर काळ्या डागांमध्ये होते.
(नक्की वाचा: When To Replace Matka: मडके कधी बदलावे, मडक्याची एक्सपायरी डेट कशी ओळखावी? जुन्या मडक्यामुळे काय परिणाम होतील?)

Photo Credit: AI
(नक्की वाचा: How To Reduce Roof Heat: उन्हाळ्यात तुमच्या घराचे छत प्रचंड तापतंय? फॉलो करा 4 सोपे उपाय, AC विनाच घर होईल थंडगार)
तवा स्वच्छ करण्याचे प्रभावी घरगुती उपाय (Tips And Tricks To Clean Burnt Tawa At Home)
- लिंबू आणि मिठाचा वापर: तवा हलका गरम करून त्यावर थोडे मीठ टाका. आता लिंबाच्या फोडी तव्यावर हळूहळू रगडा. मीठ आणि लिंबाच्या रासायनिक प्रक्रियेमुळे साचलेली घाण स्वच्छ होण्यास मदत मिळेल.
- बेकिंग सोडा: जर तवा जास्तच जळलेला असेल तर बेकिंग सोड्याचा उपाय रामबाण ठरू शकतो. तव्यावर थोडे पाणी टाकून त्यावर बेकिंग सोडा शिंपडा. 10 ते 15 मिनिटांनंतर स्क्रबरने हलक्या हाताने घासल्यास काळे डाग सहज निघून जातात.
- व्हिनेगर आणि गरम पाणी: एका मोठ्या भांड्यात गरम पाणी आणि थोडे व्हिनेगर घ्या. यामध्ये तवा काही वेळ भिजत ठेवा. यामुळे कडक झालेले थर मऊ होतात आणि स्क्रब केल्यावर तवा लगेच स्वच्छ होईल.
- तवा स्वच्छ करताना कोणती काळजी घ्यावी: तवा स्वच्छ करताना तो खूप जोरात घासणे टाळावे, अन्यथा तव्याचा पृष्ठभाग खराब होऊ शकतो. तसेच धुतल्यानंतर तवा कोरड्या कापडाने पुसून ठेवावा, ज्यामुळे त्याला गंज (Rust) लागणार नाही.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world