तुमची मांडी सांगणार तुम्ही किती वर्ष जगणार? डॉ. सेठींनी 12 वर्षांच्या रीसर्चमधील सांगितला मोठा खुलासा

Thigh Size and Life Expectancy: तुमच्या मांडीचा आकार आणि ताकद ठरवू शकते तुमचे आयुष्य. डॉ. सौरभ सेठी यांनी सांगितलेले 12 वर्षांच्या संशोधनातील निष्कर्ष, हृदयविकाराचा धोका आणि पाय मजबूत करण्याचे सोपे उपाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Thigh Size and Life Expectancy: मांड्यांचा आकार आणि दीर्घ आयुष्याचा काय आहे संबंध? समोर आला धक्कादायक रिपोर्ट"
Canva

Thigh Size And Life Expectancy: आपले शरीर आपण किती निरोगी आहोत हे सांगत असते. पण तुम्हाला हे माहिती आहे का की तुमच्या मांडीचा (Thigh) आकार तुम्ही किती दिवस जिवंत राहू शकता हे सांगू शकतो? होय, हे आम्ही नाही तर नुकतेच डॉक्टर सौरभ सेठी यांनी समजावून सांगितले आहे. डॉ. सेठी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलंय की, तुमच्या मांड्यांचा आकार हे ठरवण्यात मदत करू शकतो की तुम्ही किती काळ निरोगी आणि जिवंत राहाल.

डॉक्टर सौरभ सेठी (Dr. Saurabh Sethi) यांच्या मते, नुकत्याच झालेल्या एका नवीन संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे की तुमच्या मांड्यांचा आकार आणि ताकद हे ठरवण्यास मदत करते की तुम्ही किती दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगाल. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीने ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे.

Advertisement

12 वर्षांच्या संशोधनात मोठा खुलासा

सुमारे 3,000 प्रौढांवर पूर्ण 12 वर्षे एक ऐतिहासिक अभ्यास (Study) करण्यात आला. या संशोधनात असे दिसून आले की ज्या लोकांच्या मांड्या छोट्या किंवा कमकुवत होत्या, त्यांच्यामध्ये हृदयाचे आजार होण्याचा आणि कमी वयात मृत्यू होण्याचा धोका खूप जास्त होता.

(नक्की वाचा: Fitness Tips: मी रोज वॉक करते, तरीही शरीराने फिट का नाही? फिटनेस कोचने सांगितलं खरं कारण)

फॅट्स नव्हे स्नायू अधिक महत्त्वाचे 

मांड्यांवरील चरबीबाबत बोलले जात आहे, असा अनेकांचा गैरसमज होतो. पण तसे अजिबात नाही! प्रत्यक्षात ही चर्चा मांड्यांच्या स्नायूंबाबत (Muscles) होत आहे. मांड्या हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा स्नायू समूह (Muscle group) आहे. जेव्हा पायांचे स्नायू मजबूत असतात, तेव्हा शरीरातील ब्लड शुगरचे (Blood Sugar) नियंत्रण अधिक चांगले राहते, इन्सुलिन रेझिस्टन्स (Insulin Resistance) कमी होतो आणि हृदय दीर्घकाळ निरोगी राहते.

​आजपासूनच सुरू करा हे सोपे काम

पाय मजबूत करण्यासाठी कोणत्याही फॅन्सी जिमची गरज नाही. फक्त रोज लिफ्टचा वापर करण्याऐवजी पायऱ्या चढा. याशिवाय हातांचा आधार न घेता खुर्चीवरून वारंवार उठण्याची आणि बसण्याची सवय लावा. या छोट्या-छोट्या सवयी तुमचे पाय मजबूत करून तुमचे आयुष्य वाढवू शकतात.

Advertisement

(नक्की वाचा: Poisonous Liquor: दारूच्या एका पेगमध्ये लपलाय मृत्यू! तुम्ही पित असलेली दारू खरी आहे की विष? ओळखा ही लक्षणं)

काय सांगते संशोधन?

'बीएमजे स्टडी'नुसार (BMJ Study) 3,000 लोकांवर 12 वर्षांपर्यंत केलेल्या या संशोधनात बारीक मांड्या असलेल्या लोकांमध्ये हृदयविकार आणि अकाली मृत्यूचा धोका जास्त असल्याचे दिसून आले.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)