यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने आधार मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 1 वर्षाने वाढवली आहे. UIDAI ने 14 जून 2026 पर्यंत कागदपत्रे मोफत ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधा वाढवली आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये, UIDAI ने म्हटले आहे की ही मोफत सेवा MyAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. आधारकार्ड धारक आता ओळखीचा पुरावा किंवा पत्ता पुरावा कागदपत्रे अपलोड करून अपडेट करु शकतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुणाला आधारकार्ड अपडेट करावं लागेल?
ज्यांच्याकडे 10 वर्षे किंवा त्याहून अधिक जुने आधार कार्ड आहे, त्यांना ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासह त्यांचे आधार अपडेट करावे लागेल. म्हणजेच जर तुमच्याकडे 10 वर्षे जुने आधार कार्ड असेल आणि या कालावधीत तुमचे आधार एकदाही अपडेट केले गेले नसेल, तर तुम्हाला ते अपडेट करावे लागेल. अन्यथा तुमचे आधार कार्ड देखील रद्द केले जाऊ शकते.
आधार अपडेटसाठी ही कागदपत्रे आवश्यक असतील
आधार अपडेटसाठी तुम्हाला दोन महत्त्वाची कागदपत्रे लागतील. पहिले ओळखपत्र आणि दुसरे पत्त्याचा पुरावा. साधारणपणे, आधार केंद्र आधार अपडेटसाठी 50 रुपये आकारते. परंतु UIDAI नुसार, ही सेवा 14 जून 2026 पर्यंत मोफत आहे. तुम्ही ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड आणि पत्त्यासाठी मतदार कार्ड देऊ शकता.
(नक्की वाचा : Voter ID डाऊनलोड कसा करणार? वाचा सोपी पद्धत, काही मिनिटांमध्येच होईल काम)
स्वतः आधार कसे अपडेट करावे?
UIDAI वेबसाइटवर जा, त्यानंतर आधार अपडेट करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि OTP वापरून लॉगिन करा. त्यानंतर डॉक्युमेंट अपडेट आणि व्हेरिफायवर क्लिक करा.
खालील ड्रॉप लिस्टमधून ओळखपत्र आणि पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
सबमिट वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट नंबर मिळेल आणि फॉर्म सबमिट केला जाईल.
तुम्ही रिक्वेस्ट नंबरवरून अपडेटची स्थिती देखील तपासू शकाल.
काही दिवसांनी तुमचा आधार अपडेट होईल.