Vastu Tips In Marathi: वास्तूशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीशी संबंधित महत्त्वपूर्ण नियम सांगितलेले आहेत. यानुसार प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते. म्हणूनच वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये प्रत्येक गोष्ट योग्य दिशेला ठेवणे महत्त्वपूर्ण मानले जाते. वास्तूशास्त्राच्या नियमांचे पालन केल्यास जीवनामध्ये सुखसमृद्धी येण्यास मदत मिळू शकते. वास्तूशास्त्रामध्ये आरशाशी संबंधित देखील नियम नमूद केलेला आहे. ज्योतिषाचार्य अनिल गुप्ता यांनी घरामध्ये आरसा लावण्याची योग्य दिशा कोणती? याबाबत सांगितलेली माहिती जाणून घेऊया...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
(नक्की वाचा: 7 June 2025: 7 जूनला विनाश? सिंह राशीवर प्रभाव आणि बाबा वेंगाचे मोठे भाकीत ज्योतिषाचार्य अनिल गुप्ता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. घरामध्ये चुकीच्या ठिकाणी आरसा लावल्यास प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, याची माहिती दिलीय. अनिल गुप्ता यांनी सांगितले की, आरसा कायम उत्तर किंवा पूर्व दिशेमध्ये लावावा. तसेच बेडरुममध्येही आरसा अशा ठिकाणी लावू नये जेथून तुमचे शरीर तुम्हाला दिसेल. यामुळे तणाव तसेच झोपेशी संबंधित समस्याही निर्माण होऊ शकतात. याव्यतिरिक्त मुख्य प्रवेशद्वारावरही आरसा लावू नये, यामुळे घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते. तसेच ड्रेसिंग टेबलसोबत सुंदर चित्र आणि रोपे ठेवावे, यामुळे सकारात्मकता निर्माण होते. (नक्की वाचा: Silver Chain Benefits: चांदीची साखळी घालण्याचे फायदे) (Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) घरामध्ये कोणत्या दिशेला आरसा लावावा?
कोणत्या दिशेला आरसा लावू नये?