Tulsi Plant Benefits: हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाचे विशेष महत्त्व आहे. घरातल्या देवांसह सकाळी आणि संध्याकाळी या रोपाचीही मनोभावे पूजा केली जाते. पण घरामध्ये तुळशीचे कोणते रोप आणणे वास्तुनुसार फायदेशीर ठरेल, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
राम तुळस कशी असते? | RamTulas Benefits
बहुतांश घरामध्ये राम तुळशीचे रोप पाहायला मिळते. या तुळशीची पाने हिरव्या रंगाची असतात. हिंदू मान्यतेनुसार राम तुळस सुख-समृद्धी आणि पावित्र्याचे प्रतीक मानली जाते. ज्या घरामध्ये राम तुळस असते, तेथे कायम सकारात्मक ऊर्जा असते.
कृष्ण तुळस | Krishna Tulas Benefits
कृष्ण तुळशीच्या रोपाची पाने हलक्या स्वरुपातील जांभळ्या किंवा काळ्या रंगाची असतात. राम तुळशीच्या तुलनेत कृष्ण तुळशीची पाने चवीला थोडीशी कमी गोड असतात. पण कृष्ण तुळशीतील गुणधर्मही तितकेच प्रभावी आहेत. आयुर्वेदिक औषधोपचारांमध्ये कृष्ण तुळशीचा विशेष स्वरुपात वापर केला जातो.
(नक्की वाचा: Tulsi Puja: राम तुळस की श्याम तुळस, कोणत्या रोपाची करावी पूजा?)
घरामध्ये कोणत्या तुळशीचे रोप असावे?
हिंदू मान्यतेनुसार घरामध्ये राम आणि कृष्ण दोन्ही प्रकारच्या तुळशीचे रोप तुम्ही ठेवू शकता. दोन्ही रोपांची पूजा केली जाते आणि दोन्ही घरासाठी लाभदायक आहेत. केवळ घरातील योग्य दिशेला तुळशीचे रोप ठेवावे.
वास्तूनुसार घरामध्ये कोणत्या दिशेला तुळशीचे रोप ठेवावे? | Tulsi Plant Vastu Tips
वास्तुनुसार तुळशीचे रोप लावण्यासाठी घराची उत्तर दिशा सर्वोत्तम मानली जाते. याशिवाय घराच्या पूर्व आणि ईशान्य दिशेलाही तुळशीच्या रोपाची लागवड करू शकता. या दिशांना तुळशीच्या रोपाची कुंडी ठेवून पूजा केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते, असे म्हणतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)