Vehicle Modification Rules: आजकल कार किंवा बाईक प्रेमींमध्ये त्यांच्या वाहनात बदल म्हणजेच मॉडिफिकेशन करून घेण्याची एक मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. गाडी इतरांपेक्षा वेगळी आणि आकर्षक दिसावी यासाठी अनेक जण महागडे अलॉय व्हील्स, हेवी साउंड सिस्टम, मोठ्या लाईट्स किंवा थेट इंजिनमध्येच मोठे बदल करून घेतात. पण, स्वतःच्या आवडीसाठी आणि हौसेपोटी केलेले हे मॉडिफिकेशन भविष्यात तुमच्या खिशाला मोठा फटका लावू शकते, याची कल्पना फार कमी लोकांना असते.
वाहनात कोणताही बदल केल्यानंतर विमा म्हणजेच इन्शुरन्स कंपनीला त्याची माहिती देणे अत्यंत आवश्यक असते, अन्यथा अपघाताच्या वेळी तुमचा क्लेम पूर्णपणे नाकारला जाऊ शकतो.
नॅशनल क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा महत्त्वाचा इशारा
नॅशनल क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने म्हणजेच एनसीआयबीने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या संदर्भात वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. या माहितीनुसार, वाहनामध्ये कोणत्याही प्रकारचा अंतर्गत किंवा बाह्य बदल केल्यानंतर इन्शुरन्स कंपनीला त्याबद्दल तात्काळ कळवणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे.
इन्शुरन्स कायद्यानुसार, वाहनात कोणताही मोठा बदल केल्यास विमा कंपनीला सूचित करणे आणि त्या बदल्यात पॉलिसीवर एंडोर्समेंट म्हणजेच मंजुरीचे प्रमाणपत्र मिळवणे अत्यंत गरजेचे असते.
( नक्की वाचा : मुंबईकरांनो, तुम्ही खात असलेले आईस्क्रीम थेट हार्ट अटॅकला आमंत्रण तर देत नाही ना? तिशीमध्येच येतोय झटका )
विमा कंपनीला न कळवल्यास काय होईल
तुम्ही तुमच्या कार किंवा बाईकमध्ये मोठ्या प्रमाणावर मॉडिफिकेशन केले असेल आणि त्याची कोणतीही नोंद इन्शुरन्स कंपनीकडे केली नसेल, तर तो थेट विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग मानला जातो. अशा परिस्थितीत, भविष्यात वाहनाचा अपघात झाल्यास किंवा वाहन चोरीला गेल्यास विमा कंपनी तुमचा क्लेम थेट फेटाळून लावू शकते.
नुकसान झाले तरी विमा कंपनीकडून एक रुपयाही मिळत नसल्याने लाखो रुपयांचा खर्च स्वतःच्या खिशाातून करावा लागतो. त्यामुळे वाहनात कोणताही बदल करताना किंवा केल्यानंतर विमा कंपनीला लेखी स्वरूपात कळवणे हाच एकमेव सुरक्षित मार्ग आहे.
( नक्की वाचा : Weight Loss: 101 किलोवरून थेट 65 वर; 7 महिन्यांत 36 किलो वजन कमी करण्याचं तरुणीनं सांगितलं गुपित )
मॉडिफिकेशन करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
आपल्या वाहनात कोणतेही मॉडिफिकेशन करायचे असल्यास सर्वात आधी किंवा बदल केल्यानंतर लगेचच आपल्या इन्शुरन्स कंपनीला लेखी स्वरूपात संपूर्ण माहिती द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विमा कंपनीला पूर्वकल्पना दिल्याशिवाय गाडीमध्ये कोणताही मोठा किंवा कायमस्वरूपी बदल करणे टाळावे.
बदल केल्यानंतर इन्शुरन्स कंपनीकडून एंडोर्समेंट म्हणजेच त्या बदलाची पॉलिसीवरील अधिकृत नोंद नक्की करून घ्या. याशिवाय, कंपनीला माहिती देताना ती पूर्णपणे अचूक आणि खरी असावी, कारण कोणतीही माहिती लपवणे किंवा चुकीची माहिती देणे नंतर मोठ्या नुकसानीचे कारण ठरू शकते.
वाहन चालकों के लिए आवश्यक जानकारी। pic.twitter.com/g8Rq3PiRX9
— NCIB Headquarters (@NCIBHQ) June 12, 2026
क्लेम फेटाळण्याची डोकेदुखी वेळीच टाळा
वाहनाचा इन्शुरन्स केवळ काढणे पुरेसे नसून, तो अडचणीच्या काळात क्लेम करताना सुरक्षित राहणे जास्त महत्त्वाचे आहे. विना मंजुरी म्हणजेच विना एंडोर्समेंट केलेल्या कोणत्याही बदलामुळे अपघात किंवा नुकसानीच्या वेळी इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कायदेशीर अडचणी आणि ऐनवेळी होणारी पैशांची धावपळ टाळण्यासाठी गाड्यांचे शौकीन असणाऱ्या प्रत्येकाने मॉडिफिकेशनच्या या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world