जाहिरात
This Article is From Feb 20, 2026

'Iron Burn' Shirt: इस्त्रीने जळालेला शर्ट आणि किंमत १ लाख! लक्झरी ब्रँडची अजब फॅशन

फॅशन ब्रँड व्हेटमेंट्सने इस्त्रीने जळाल्यासारखा डिझाइन असलेला शर्ट १ लाख रुपयांना विकायला काढला आहे. 'माझी आई असे शर्ट मोफत बनवते' अशा शब्दांत नेटकऱ्यांनी या फॅशनची खिल्ली उडवली आहे.

Also Read in
'Iron Burn' Shirt: इस्त्रीने जळालेला शर्ट आणि किंमत १ लाख! लक्झरी ब्रँडची अजब फॅशन

फॅशनच्या जगात कधी काय नवीन येईल याचा नेम नाही, पण कधीकधी ही 'क्रिएटिव्हिटी' हास्यास्पद ठरते. लक्झरी फॅशन ब्रँड 'व्हेटमेंट्स' सध्या आपल्या एका अजब क्रिएटिव्हिटीमुळे जगभरातून टीकेचे धनी ठरत आहे. साधा पांढरा शर्ट, त्यावर इस्त्रीने जळाल्याचा डाग (Iron Burn) आणि त्याची किंमत तब्बल 1 लाख रुपये. शर्टाच्या खिशावर इस्त्री जास्त वेळ ठेवल्यामुळे जसा पिवळसर-तपकिरी डाग पडतो, तसा 'डिझाइन'चा भाग म्हणून छापण्यात आला आहे.

'व्हाईट आयरनिंग बर्न ग्राफिक शर्ट'

या शर्टचे अधिकृत नाव 'White Ironing Burn Graphic Shirt' असे आहे. हा ओव्हरसाईज शर्ट असून त्यावर इस्त्रीने कापड जळाल्याचा आभास निर्माण करणारे ग्राफिक डिझाइन आहे. विशेष म्हणजे, या एका साध्या पण 'जळालेल्या' शर्टची किंमत 1139 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 1 लाख रुपये* आहे.
 

कमेट्सचा पाऊस 

सोशल मीडियावर या शर्टचा फोटो व्हायरल होताच लोकांनी या ब्रँडची जोरदार खिल्ली उडवली आहे. "माझ्या लाँड्रीमध्ये अशा 'हाय-फॅशन' कपड्यांचा ढिगारा पडला आहे," अशी कमेंट एका युजरने केली. "आता मला माझ्या नवऱ्याचा शर्ट इस्त्रीने जाळल्याचे दुःख होणार नाही, मी सांगेन की तो या ब्रँडचा आहे," असा जोक एका महिलेने केला. "ही फॅशन नसून थट्टा आहे. लोक केवळ  लाख खर्च केले हे सांगण्यासाठी हा कचरा विकत घेतील," अशा शब्दांत एका युजरने संताप व्यक्त केला.

'डॅमेज्ड' फॅशनचा ट्रेंड की लूट?

लक्झरी ब्रँड्सनी फाटलेले शूज किंवा मळलेले कपडे महागड्या किमतीत विकण्याची ही पहिलीच वेळ नाही. फॅशन तज्ज्ञांच्या मते, हे ब्रँड्स 'एक्सक्लुझिव्हिटी'च्या नावाखाली ग्राहकांच्या मानसिकतेशी खेळत आहेत.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com