हृदय विकाराचा त्रास कमी होण्यासाठी विड्याचं पान उपयोगी! विश्वास बसत नसेल तर लगेच करा क्लिक

विड्याच्या पानात व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असून केरोटिनचे प्रमाण अधिक आहे.विड्याचे पान हे पचनास उपयुक्त असून यामुळे भूक वाढण्यास मदत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रातिनिधीक फोटो
वाचा

विड्याचं पान भारतीय जेवणाचा महत्त्वाचा भाग आहे. हृदय विकारांसाठी उपयुक्त असून पचन सुधारते. मात्र, पित्तजनक व्यक्तींनी सावध राहावे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच सेवन करावे, असं डॉक्टर महेश ठाकूर यांनी सांगितलं आहे.

आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
ठाणे:

भारतीय जेवणाचा पिढ्यानपिढ्या अव घटक असलेला भाग म्हणजे विड्याचं पानं. शहरी असो वा ग्रामीण सर्वच भागात विड्याचे पान खाणारे शौकीन आढळतात. अनेक घरांमध्ये रोज हे पान खाल्लं जात नसलं तरी एखाद्या विशेष पंगतीनंतर हे पान आवर्जून खाल्लं जातं. विड्याचं पान हे आरोग्यासाठी हानिकारक आहे की नाही? याबाबत वेगवेगळी मतं आहेत. आम्ही तुम्हाला याबाबत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

हृदय विकरासाठी उपयुक्त  'हृदय विकाराचा त्रास आहे अशा सर्वांसाठी विड्याचे पान उपयुक्त आहे. हा त्रास असलेल्या व्यक्तींनी जेवल्यानंतर विड्याचं पान खावं.यामुळे पचन हलके होईल आणि गॅसेस होणार नाहीत.विड्याच्या पानात व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असून केरोटिनचे प्रमाण अधिक आहे.गळू झाल्यानंतर तो बरा होण्यासाठी विड्याचे पान त्याला लावावे हा एक उत्तम आयुर्वेदिक उपाय आहे ,अशी माहिती डोंबिवलीतील आयुर्वेदिक डॉक्टर महेश ठाकूर यांनी दिली आहे.

त्रयोदशगुणी विडा....

त्रयोदशगुणी विडा म्हणून विड्याच्या पानाला मान्यता आहे. हे पान शुभकार्यात दिलं जातं. त्यामध्ये कात,वेलची,केसर,सुपारी, लवंग,खोबरं यासह एकूण 13 प्रकार टाकले जातात.शुभकार्यात जेवण भरपेट होते.त्यानंतर पचनास त्रास होऊ नये म्हणून हे पान दिले जाते. 

पचनास उपयुक्त 

विड्याचे पान हे पचनास उपयुक्त असून यामुळे भूक वाढण्यास मदत होते.यामुळे पोटातील जंत मरतात. तोंड स्वच्छ होते.लाळ निर्माण करणारं आणि पाचक स्त्राव वाढवणारं पान म्हणून आयुर्वेदात त्याचे वर्णन केले आहे. त्यामुळे जेवणानंतर विड्याचे पान खाण्याची पद्धत आहे.

कुणी घ्यावी काळजी?

या पानाला तांबूल किंवा नागवेलचे पान असेही म्हंटले जाते.ज्यांची प्रवृत्ती पित्तजनक आहे त्यांनी हे पान अधिक खाऊ नये. विड्याचे पान हे उष्ण आहे. त्यामुळे हे अधिक खाल्ले तर पित्त वाढवण्याचे काम करते, असा सल्ला डॉ. ठाकूर यांनी दिला.

Advertisement

स्पष्टीकरण: या बातमीतील मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक असून त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. NDTV मराठी या माहितीसाठी जबाबदार नाही

Topics mentioned in this article