Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेने त्रस्त? शाकाहारींसाठी वरदान ठरेल फक्त 'ही' 1 गोष्ट

Vitamin B12 Deficiency: शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता शाकाहारी लोकांमध्ये सर्वाधिक आढळते. न्यूट्रिशनिस्ट पलक नागपाल यांनी शाकाहारींसाठी एक उत्तम पर्याय सांगितला आहे, ज्यामुळे शरीरातील थकवा, कमजोरी आणि मुंग्या येण्याची समस्या दूर होऊ शकते.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन B12 युक्त पदार्थ"
Canva

Vitamin B12 Deficiency: हल्ली बहुतांश लोक व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे त्रस्त असल्याचे पाहायला मिळते. हे व्हिटॅमिन प्रामुख्याने अंडी, मासे, चिकन आणि इतर मांसाहारी पदार्थांमध्ये आढळते. याच कारणामुळे शाकाहारी आणि व्हीगन (Vegan) लोकांमध्ये या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण होण्याचा धोका जास्त असतो. व्हिटॅमिन B12 ची कमतरता झाल्यास थकवा, कमकुवतपणा, चक्कर येणे आणि हात-पायांना मुंग्या येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हीही व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे त्रस्त असाल आणि मांसाहार करत नसाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. न्युट्रिशनिस्ट (आहारतज्ज्ञ) पलक नागपाल यांनी अशा एका खाद्यपदार्थाबाबत माहिती दिलीय जी शाकाहारी लोकांमधील व्हिटॅमिन B12 ची कमतरता भरून काढण्यास मदत करू शकते. 

कोणता आहे तो जादुई पदार्थ?

न्युट्रिशनिस्ट पलक यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलंय की, 'न्युट्रिशनल यीस्ट' (Nutritional Yeast) व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचा सामना करणाऱ्या लोकांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो, विशेषतः जेव्हा ते व्हिटॅमिन B12 ने फोर्टिफाइड केलेले असते. जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुमच्या शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता असेल तर फक्त एक चमचा ही गोष्ट तुमची रोजची व्हिटॅमिन B12 ची गरज पूर्ण करण्यास मदत करू शकते, असेही त्यांनी सांगितलंय. 

Advertisement

(नक्की वाचा: Vitamin D Foods: कोवळ्या उन्हाशिवाय शरीराला कसं मिळणार व्हिटॅमिन डी? डाएटमध्ये या 3 गोष्टींचा करा समावेश)

न्युट्रिशनल यीस्ट का आहे खास?

न्युट्रिशनिस्टनी सांगितले की 'न्युट्रिशनल यीस्ट' हे त्याच्या चीझी (चीजसारखी चव) आणि हलक्या स्वरुपातील नट्ससारख्या चवीसाठी ओळखले जाते; याचसोबत त्यामध्ये अनेक पोषक तत्त्वांचाही समावेश असतो. पलक नागपाल यांच्या मते, साधारण एक टेबलस्पून (सुमारे पाच ग्रॅम) फोर्टिफाइड न्युट्रिशनल यीस्टमध्ये अनेक महत्त्वपूर्ण पोषक तत्त्वे असतात.

कमी कॅलरी, जास्त पोषणतत्त्व

एक टेबलस्पून न्युट्रिशनल यीस्टमध्ये सुमारे 20 कॅलरीज असतात. म्हणजेच कमी कॅलरीजमध्ये शरीराला अनेक आवश्यक पोषक तत्त्वे मिळू शकतात.

प्रोटीनचा स्रोत

एक टेबलस्पून न्युट्रिशनल यीस्टमध्ये सुमारे 4 ते 5 ग्रॅम प्रोटीन आढळते, जे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते.

(नक्की वाचा: Morning Routine Tips: रात्री 8 तास झोपूनही सकाळी थकवा जाणवतो? सकाळी उठल्यानंतर 3 कामं करा, दिवसभर वाटेल फ्रेश)

व्हिटॅमिन B12 ची गरज पूर्ण करण्यास मदत

एक चमचा न्युट्रिशनल यीस्ट खाल्ल्यास शरीराला सुमारे 2.4 ते 5 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन B12 मिळू शकते, जे बहुतेक लोकांची रोजची व्हिटॅमिनची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसे मानले जाते.

न्युट्रिशनल यीस्टचा आहारात कसा समावेश करावा?

न्युट्रिशनिस्ट पलक नागपाल यांच्या मते तुम्ही याचा वापर खालील पदार्थांमध्ये करू शकता:

  • सॅलड (सलाद)
  • पास्ता
  • पॉपकॉर्न
  • भाजलेल्या भाज्यांमध्ये न्युट्रिशनल यीस्टचा समावेश करू शकता. 

अन्य पद्धतींनीही करा वापर

  • न्युट्रिशनल यीस्टचा सूप, सँडविच आणि ग्रेन बाउल्स यामध्येही केला जाऊ शकतो.
  • न्युट्रिशनल यीस्टमुळे जेवणाची चव तर वाढतेच सोबतच जास्त कॅलरीज् न वाढता अतिरिक्त पोषणही मिळते.

 न्युट्रिशनिस्ट पलक नागपाल यांनी शेअर केलेली पोस्ट 

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)