Taurus Yearly Horoscope 2025 : नवीन वर्ष म्हणजेच 2026 हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांमध्ये कमालीचा आत्मविश्वास निर्माण करणारे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी पोषक स्थिती निर्माण करणारे वर्ष ठरेल. टॅरो कार्ड्सच्या गणितानुसार, या राशीसाठी 'जजमेंट' (Judgement) हे कार्ड विशेष प्रभावी ठरणार आहे. याचा अर्थ असा की गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या मनावर असलेले विविध प्रकारचे ओझे आता उतरणार असून या राशीची लोक एका नवीन आणि सकारात्मक दिशेने प्रवासाला सुरुवात करतील. वर्षाच्या सुरुवातीला काही निर्णयांबाबत मनात संभ्रम असू शकतो, पण काळानुरूप विचारात स्पष्टता येत जाईल.
करिअर आणि व्यवसाय
करिअर आणि व्यवसायाचा विचार करता हे वर्ष अत्यंत धोरणात्मक असेल. प्रसिद्ध टॅरो कार्ड रीडर विन्नी भाटिया यांच्या मते, वृषभ राशीच्या व्यक्तींनी आपल्या भावी योजना गुप्त ठेवणे हिताचे ठरेल. 'एस ऑफ वॉन्ड्स' (Ace of Wands) हे कार्ड नवीन सुरुवातीचे संकेत देत आहे. यामुळे नोकरीत पदोन्नती, नवीन प्रकल्प किंवा व्यवसायात विस्ताराच्या संधी चालून येतील. ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहून केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित केल्यास वर्षाच्या मध्यात मोठे यश आणि मान-सन्मान मिळण्याचे प्रबळ योग आहेत.
नातेसंबंध
आगामी 2026 हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक स्थैर्य देणारे आणि नातेसंबंधांची वीण घट्ट करणारे ठरेल. टॅरो कार्ड्सच्या विश्लेषणानुसार, तुम्ही कुटुंबातील महत्त्वाचे आधारस्तंभ बनाल. अनेक दिवसांपासून घरामध्ये सुरू असलेली मतभिन्नता दूर होऊन एक प्रकारची शिस्त प्राप्त होईल. विशेषतः कुटुंबासाठी तुम्ही घेतलेले कष्ट आणि कुटुंबाला दिलेला वेळ या बाबी सकारात्मक फळ देतील. मात्र घरातील गुपिते बाहेरच्यांना सांगणे किंवा महत्त्वाच्या चर्चा सर्वांसमोर करणे महागात पडू शकते, त्यामुळे गोपनीयता राखणे गरजेचे आहे.
प्रेमसंबंधांच्या बाबतीत 2026 हे वर्ष संमिश्र असेल. तुमच्या आयुष्यात प्रेमाची झुळूक येईल, नवीन नात्याची चाहूल लागेल, आयुष्यात प्रेमाचे अंकुर पुलतील. पण हे नाते स्वीकारताना कुटुंबातून काहीसा विरोध किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. संयम राखल्यास वर्षाच्या अखेरीस गोष्टी तुमच्या बाजूने झुकतील. विवाह इच्छुकांसाठी वर्षाचा मध्य काळ अत्यंत अनुकूल आहे. आरोग्याचा विचार करता, यंदा प्रकृतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जुन्या तक्रारी दूर होतील, पण दैनंदिन आहार आणि व्यायामात सातत्य ठेवावे लागेल.
(नक्की वाचा: Aries Horoscope 2026: अडचणी दूर होऊन मनातील इच्छा पूर्ण होतील, मेष राशीने 2026 कोणते उपाय करावे?)
नवीन वर्षाचे 12 महिने कसे असतील?
जानेवारी (Ace of Pentacles): या महिन्यात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. नोकरी किंवा व्यवसायात आर्थिक लाभाच्या मोठ्या संधी मिळतील.
फेब्रुवारी (The World): रखडलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि तुमच्या कष्टाचे कौतुक होईल.
मार्च (Queen of Cups): हा महिना कौटुंबिक सुखाचा असेल. नातेसंबंधांत सुधारणा होईल आणि तुम्ही मनाचे ऐकून योग्य निर्णय घ्याल.
एप्रिल (King of Pentacles): आर्थिक सुबत्ता लाभेल. नोकरीत पदोन्नती आणि संपत्तीत वाढ होण्याचे प्रबळ संकेत आहेत.
मे (Five of Swords): या महिन्यात सावध राहा. वादविवाद आणि ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहणे हिताचे ठरेल.
जून (Four of Wands): घरात आनंदाचे वातावरण असेल. लग्नसराईसारख्या मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
जुलै (Seven of Wands): स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत करावी लागेल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील.
ऑगस्ट (Judgement): जुन्या मेहनतीचे फळ मिळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील.
सप्टेंबर (Temperance): मानसिक शांती लाभेल आणि आरोग्यात सुधारणा होईल.
ऑक्टोबर (Knight of Wands): कामाचा वेग वाढेल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि समाजात मान-सन्मान वाढेल.
नोव्हेंबर (Death): हा महिना मोठ्या परिवर्तनाचा आहे. जुन्या गोष्टी सोडून तुम्ही नवीन वाटेवर प्रवासाला सुरुवात कराल.
डिसेंबर (Two of Wands): नवीन योजनांवर काम सुरू कराल. परदेश प्रवासाचे योग असून भविष्यातील विस्तारासाठी हा काळ महत्त्वाचा आहे.
(नक्की वाचा: Kark Rashifal 2026: आयुष्यात नवी चमक आणेल वर्ष 2026, करिअर आणि आर्थिक स्थिती कशी असेल? वाचा कर्क राशीचे वार्षिक राशीभविष्य)
वृषभ राशीच्या लोकांनी काय उपाय करावा?- चिंता करण्याऐवजी चिंतन करणे वृषभ राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरेल.
- तन आणि मन प्रफुल्लित राहावे यासाठी सूर्यदेवतेला अर्घ्य द्यावे.
- वाद-विवादापासून दूर राहा.
- आठवड्यातून एकदा पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने आंघोळ करा.
- शनिवारच्या दिवशी काळे तीळ दान केल्यानेही फायदा होईल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)