जाहिरात

Aries Horoscope 2026: अडचणी दूर होऊन मनातील इच्छा पूर्ण होतील, मेष राशीने 2026 कोणते उपाय करावे?

Aries Horoscope 2026: मेष राशीकरिता 2026 वर्ष परिवर्तन आणि दिशा बदलणारं ठरणार आहे. हे वर्ष तुमच्याकरिता जुन्या संघर्षापासून मुक्त करणारं ठरेल. टॅरोनुसार मेष राशीसाठी वर्ष 2026 कसं ठरेल, याबाबत माहिती जाणून घेऊया...

Aries Horoscope 2026: अडचणी दूर होऊन मनातील इच्छा पूर्ण होतील, मेष राशीने 2026 कोणते उपाय करावे?
"Aries Horoscope 2026: मेष राशीसाठी 2026 वर्ष कसे असेल?"
Canva

Aries Horoscope 2026: मेष राशीसाठी 2026 हे वर्ष शून्यातून सुरुवात करण्यासाठी किंवा नवीन प्रवासाचे वर्ष ठरणार आहे. नवीन वर्षात The Fool तुमच्यासाठी नव्या संधीचे द्वार उघडणार आहे, तर ज्या गोष्टी आता तुमच्यासाठी कामाच्या राहिलेल्या नाहीत उदाहरणार्थ जुनी नोकरी किंवा स्वार्थी नातेसंबंध त्यापासून मुक्तता मिळणार असल्याचे संकेत Five of Pentacles द्वारे मिळत आहेत. नवीन वर्षात तुम्हाला अधिक सुरक्षित वाटेल. मेष राशीच्या लोकांसाठी 2026 कसे ठरणार आहे? जुन्या संघर्षांपासून कशी मुक्तता मिळेल? याबाबत प्रसिद्ध कार्ड रीडर आणि हीलर विन्नी भाटीया यांनी दिलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया..

करिअर आणि व्यवसाय

मेष राशीकरिता Ace of Swords, 3 of Wands आणि 10 of Swords कार्ड्स मोठ्या यशाचे संकेत देत आहेत. मेष राशीसाठी वर्षाच्या सुरुवातीस करिअरशी संबंधित थोडीशी अस्वस्थता जाणवू शकते पण Ace of Swords कार्ड लवकरच तुम्हाला एक मोठे यश मिळणार असल्याचे संकेत देत आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत मोठे बदल पाहायला मिळतील आणि तुमच्या मोठ्या समस्या समाप्तही होतील. परदेशातील संधी आणि नवे व्यापारी करार फायदेशीर ठरतील. नव्या वर्षात पैसा वाढेल आणि गुंतवणूक वाढेल. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला पूर्ण यश मिळेल.

नातेसंबंध आणि प्रेमसंबंध

Queen of Pentacles आणि Ace of Pentacles कार्ड्स मेष राशीचे नातेसंबंध मजबूत होण्याचे संकेत देत आहेत. अविवाहित लोकांचं लग्न होण्यासाठी चांगल्या संधी आहेत. जे आधीपासून नातेसंबंधांमध्ये आहेत, त्यांच्यात सुसंवाद घडेल. घरामध्ये शांततेचं वातावरण असेल. वर्षाच्या अखेरीस कुटुंबात शुभ उत्सव होण्याची शक्यता आहे.

आरोग्य

The High Priestess चा सल्ला आहे की शरीराचे संकेत ऐका आणि आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. वर्ष 2026मध्ये योग आणि ध्यान करणं लाभदायक ठरेल.

2026मधील 12 महिने कसे असतील?

जानेवारी (King of Swords): मेष राशीच्या लोकांच्या वर्षाची सुरुवात अधिकार आणि ओळखीनं होईल. कार्यक्षेत्रात तुमचे स्थान मजबूत होईल पण अहंकार बाळगणं टाळा.

फेब्रुवारी (The Sun): जीवनात नवा प्रकाश आणि यश येईल. करिअरमध्ये प्रमोशन किंवा नव्या संधी मिळू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल.

मार्च (Page of Cups): मार्च महिना प्रेम आणि भावनांचा महिना असेल. या महिन्यात तुमचे नवीन भावनिक संबंध तयार होऊ शकतात. मनाचे म्हणणं ऐकणं गरजेचं आहे.

एप्रिल (Eight of Pentacles): एप्रिल महिना समृद्धी आणि मेनहतीचा आहे. घरातील महिला म्हणजे आई, पत्नी किंवा बहिणीचा सल्ला ऐकल्यास आर्थिक लाभ होऊ शकतात. एप्रिल महिन्यात व्यापाराचा विस्तार होण्याचे संकेत आहेत.

मे (Six of Pentacles): तुम्हाला एखाद्या प्रभावी व्यक्तीचे सहकार्य मिळेल, कार्यक्षेत्रात मदत मिळेल. व्यवहारांचा समतोल समजून घेतला पाहिजे. दुसऱ्यांची मदत केल्यास भविष्यात तुमची नाती मजबूत होतील.

जून (The World): हा महिना समाधानकारक असेल. मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खूप सुरक्षित वाटेल. तुमचे प्रतिस्पर्धी तुमचे नुकसान करू शकणार नाहीत.

Mulank 1 Numerology 2026: करिअर आणि व्यवसायात काय बदल होतील? मुलांक 1साठी वर्ष 2026 कसं असेल, काय करावे उपाय?

(नक्की वाचा: Mulank 1 Numerology 2026: करिअर आणि व्यवसायात काय बदल होतील? मुलांक 1साठी वर्ष 2026 कसं असेल, काय करावे उपाय?)

जुलै (Six of Cups): जुलै महिन्यात जुने मित्र आणि जवळच्या लोकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जुनी गुंतवणूक किंवा नातेसंबंध पुन्हा फलदायी ठरू शकतात, लग्न होण्याचीही शक्यता आहे.

ऑगस्ट (Ten of Wands): कामाचा ताण वाढू शकतो, थकवा जाणवेल. धीर बाळगा, तुम्हाला कष्टाचे सकारात्मक फळ मिळेल.

सप्टेंबर (The Hanged Man): सप्टेंबर महिना आत्मचिंतनाचा असेल. या काळात गोष्टी थोड्या धीम्या गतीने होतील, ही वेळ आयुष्यात स्पष्टता आणण्याची आवश्यकता आहे.

ऑक्टोबर (The Tower): या महिन्यात मोठे बदल अनुभवायला मिळतील. अचानक काही स्थिती बदलू शकतात. नोकरी बदलणे किंवा नातेसंबंध संपुष्टात येऊ शकतात. पण घाबरू नका; तुमच्या विकासामध्ये अडथळे आणणाऱ्या गोष्टींचा अंत होतोय, हे लक्षात घ्या.

नोव्हेंबर (Eight of Swords): तुम्हाला काही गोष्टींमध्ये अडकल्यासारखे किंवा गोंधळलेले वाटू शकते. कामाचा ताण वाढू शकतो. या महिन्यात तुम्हाला शांत राहून आंतरिक स्पष्टतेवर लक्ष केंद्रित करावे लागेल.

New Year 2026 Good Luck Tips: वर्ष 2026मध्ये आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव होईल, अडचणी होतील दूर; करा हे 9 उपाय

(नक्की वाचा: New Year 2026 Good Luck Tips: वर्ष 2026मध्ये आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव होईल, अडचणी होतील दूर; करा हे 9 उपाय)

डिसेंबर (Two of Swords): वर्षाचा अखेरचा महिना निर्णायक ठरणार आहे. या महिन्यात तुमच्यासमोर दोन मार्ग असतील, यापैकी एकाची निवड तुम्हाला करावी लागेल. घाईघाईत निर्णय घेऊ नका. हितचिंतकांकडून योग्य सल्ला घेऊन पुढे जा.

मेष राशीसाठी उपाय
  • जीवनात खूप भावनिक आणि मानसिक बदल होणार आहेत, त्यामुळे नियमित ध्यान आणि प्राणायम करावे.
  • महिन्याच्या कोणत्याही शनिवारी गरिबांना काळे चणे किंवा अन्नदान करावे.
  • हनुमानाची पूजा केल्यास आत्मविश्वासास योग्य दिशा मिळेल. विशेषतः ऑक्टोबर महिन्यातील बदलादरम्यान हा उपाय प्रभावी ठरेल.
  • ऑक्टोबर आणि ऑगस्ट महिन्यातील ताण कमी करण्यासाठी शनिवारी शनी मंत्राचा जप करावा आणि मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करावे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com