10,000 steps per day : चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करणं अत्यंत आवश्यक असतं. डॉक्टरांकडूनही चालण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. अनेकजणं दहा हजार स्टेप्सचं टार्गेट ठेवतात आणि पूर्णही करतात. मात्र सर्वच जणं इतके अॅक्टिव्ह असतात असं नाही. मात्र जर तुम्ही नियमित दहा हजार पावलं चालत असाल तर तुम्ही फार चिंता करू नका.
मेडिकल जर्नल Lancet मधील एका अभ्यासात एक मोठा खुलासा झाला आहे. दररोज सात हजार स्टेप्स पूर्ण केल्याने अकाली मृत्यू, मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोगासारखे धोके कमी होतात. या अभ्यासात अनेक नवनव्या गोष्टीही समोर आल्या आहेत.
संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांनुसार, जर एखादी व्यक्ती नियमितपणे दहा हजार स्टेप्स पूर्ण करते, तर चांगली बाब आहे. त्याऐवजी सात हजार स्टेप्सचं टार्गेट पू्र्ण करणं तुलनेतं सोपं आहे. गंभीर आरोग्याचे धोके टाळण्यासाठी सात हजार स्टेप्स चालणं पुरेसं ठरू शकतं. हा अभ्यास 57 संशोधनावर आधारित आहे. ज्यात 1.60 लाखांहून अधिक व्यक्तींचा समावेश होता. या अभ्यासानुसार, नियमित चालण्याचा व्यायाम शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चालणं शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
नक्की वाचा - Coconut Water : नारळपाणी 'या' 5 लोकांसाठी विषासमान, नियमित पित असाल तर आजपासूनच करा बदल
या अभ्यासानुसार, दररोज दोन हजार स्टेप्स पूर्ण करणाऱ्यांच्या तुलनेत सात हजार पावलं चालणाऱ्यांना मृत्यूचा धोका 47 टक्क्यांनी कमी होतो. याचप्रकारे हृदयविकाराचा धोका 25 टक्के, टाइप 2 मधुमेहाचा धोका 14 टक्के आणि विस्मरणाचा धोका 38 टक्के, डिप्रेशनचा धोका 22 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. इतकच नाही दोन हजार स्पेप्सच्या तुलनेत दररोज सात हजार पावलं चालल्याने कर्करोगासारखा घातक आजाराचा धोका सहा टक्के, अडखळून पडण्याचा धोका 28 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचं नोंदविण्यात आलं आहे. हा पहिलाच असा अभ्यास आहे, ज्यातून आरोग्यासंबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
दररोज सात हजार पावलं चालल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयासंबंधित आजाराचा धोका कमी होतो. संशोधनकर्त्यांनुसार, दररोज सात हजार पावलांचं लक्ष्य वाढवून दहा हजारांपर्यत करावं. यातून अधिक फायदा होईल. जितकं जास्त चालाल, तितका आजारांचा धोका कमी होईल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)