जाहिरात

Coconut Water : नारळपाणी 'या' 5 लोकांसाठी विषासमान, नियमित पित असाल तर आजपासूनच करा बदल

ज्या व्यक्तींच्या शरीरात उष्णता अधिक असते ते उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आपल्या आहारात बदल करतात. उष्णतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना  शरीराला हायड्रेट करण्याची आवश्यकता असते.

Coconut Water : नारळपाणी 'या' 5 लोकांसाठी विषासमान, नियमित पित असाल तर आजपासूनच करा बदल

Who should avoid coconut water: ज्या व्यक्तींच्या शरीरात उष्णता अधिक असते ते उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आपल्या आहारात बदल करतात. उष्णतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना  शरीराला हायड्रेट करण्याची आवश्यकता असते. यासाठी डाएटमध्ये ज्यूस, तास किंवा नारळ पाण्याचं प्रमाण वाढवलं जातं. काही जणांना नारळ पाणी आवडतं. तसंही नारळपाणी शरीरासाठी फायदेशीर असतं. 

यामधील विटॅमिन सी, ई, कॅल्शियम आणि पोटॅशियममुळे शरीराला फायला मिळतो. मात्र काही जणांसाठी नारळाचं पाणी नुकसानदायी ठरू शकतं. यामधील पोटॅशियम काही जणांनी अपायकारक ठरू शकतात. 


कोणासाठी नारळ पाणी वर्ज्य?  (Who should avoid coconut water)

What To Eat By Age : वयानुसार काय आणि किती खायला हवं? नेहमी फिट राहण्यासाठी डॉक्टरांकडून महत्त्वाच्या टिप्स...

नक्की वाचा - What To Eat By Age : वयानुसार काय आणि किती खायला हवं? नेहमी फिट राहण्यासाठी डॉक्टरांकडून महत्त्वाच्या टिप्स...

किडनीसंदर्भात आजार...

ज्या लोकांना किडनीसंबंधित आजार आहेत, त्यांनी नारळ पाणी पिऊ नये. नारळ पाण्यात पोटॅशियम असतं, जे किडनी फिल्टर करू शकत नाही. किडनीच्या आजारामुळे रुग्णांमध्ये आधीच पोटॅशियम आणि सोडियमचं प्रमाण अधिक असतं. अशात नारळ पाण्यामुळे हायपरकलेमिया होण्याची भीती वाढते. ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि भीती वाटू लागते.

मधुमेहाचे रुग्ण

मधुमेहींनीही नारळ पाणी पिऊ नये. नारळ पाण्यात ग्लायसेमिक इंडेक्स आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात आणि त्यामुळे साखरेची पातळी वाढण्याचा धोका वाढतो.

वयस्कांनी नारळ पाणी पिऊ नये....

वृद्धांनी दररोज नारळ पाणी पिणे टाळावे. त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात प्यायल्याने शरीरात पोटॅशियमचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे हृदयाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.

एलर्जीचा त्रास...

कोणत्याही प्रकारची एलर्जी असणाऱ्यांनी नारळ पाणी पिऊ नये. यातून त्वचेला खाज येणे, जळजळ किंवा रेडनेसचा त्रास होऊ शकतो. 

उच्च रक्तदाबाची तक्रार...

उच्च रक्तदाब असणारे किंवा याचं औषध घेणाऱ्यांनी नारळ पाणी पिऊ नये. यातून रक्तदाबाचा त्रास अधिक वाढू शकतो. 

प्रमाणाकडे लक्ष द्या... 

अधिकांश जणं उन्हाळ्यात दररोज नारळ पाणी पितात. मात्र वर दिलेल्यांनी दररोज नारळ पाणी पिणे टाळावे. जर तुम्ही उन्हात असाल, तु्म्हाला घाम येत असेल तर अर्धा ग्लास नारळ पाणी पिऊ शकता. 

शरीरात पोटॅशियम वाढलं तर काय होतं...

उच्च पोटॅशियमला वैद्यकीय भाषेत हायपरकेलेमिया म्हटलं जातं. ही स्थिती हृदयाच्या कार्य करण्याच्या क्षमतेत अडळणा आणते. यामुळे हृदयाचे ठोके कमी-जास्त होऊ शकतात किंवा गुंतागुंत वाढू शकते. 

नारळ पाणी पिण्याचे फायदे...

  • नारळ पाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
  • नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
  • नारळ पाणी ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते.
  • नारळ पाणी पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.
  • नारळ पाणी वजन कमी करण्यास मदत करते
  • नारळ पाणी त्वचा तजेलदार ठेवते
  • नारळ पाण्यामुळे केस चमकदार राहण्यास मदत मिळते
  • नारळ पाणी शरीराला डिटॉक्स करण्यात मदत करते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com