Helmet Hair Loss : हेल्मेट घातल्यानेही केस गळतात? एक्सपर्टनी सांगितलं केसांवर काय होतो परिणाम

हेल्मेट घातल्याने केस गळू शकतात का? जर तुमच्यासोबतही असं घडत असेल, तर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून या प्रश्नाचं उत्तर...

जाहिरात
Read Time: 2 mins

दुचाकी चालवताना सुरक्षिततेसाठी हेल्मेट (Hair Loss) घालणं अत्यंत आवश्यक असतं. अनेक वेळा तुम्ही डोक्यातून हेल्मेट काढल्यानंतर त्यामध्ये अनेक केस दिसतात. आपले गळणारे केस पाहून लोकांची चिंता वाढते. हेल्मेट घातल्याने केस गळू शकतात का? (wearing helmet cause hair loss?) जर तुमच्यासोबतही असं घडत असेल, तर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून या प्रश्नाचं उत्तर...

तज्ज्ञ काय म्हणतात?

प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ आणि हेअर एक्सपर्ट अंकुर सरीन यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर या प्रकरणाबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर म्हणतात, (Hair Treatment) 'हेल्मेट घातल्यामुळे केस गळण्याचे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही.जर हा दावा खरा असता तर दररोज आणि तासनतास हेल्मेट घालणारे सर्व पोलीस आणि बांधकाम कामगारांचेही केस गळाले असते. परंतू हे सत्य नाही. याशिवाय केस गळण्याचे मुख्य कारण अनुवांशिक आहे. म्हणजेच, ज्यांच्या कुटुंबात केस गळण्याचा इतिहास आहे, त्यांना जास्त धोका असतो. त्यामुळे हेल्मेट घालताना काही गोष्टींची काळजी न घेतल्याने तुमच्या केसांवर नक्कीच परिणाम होऊ शकतो.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Yoga Day 2025: बेलीफॅटपासून ते पचनप्रक्रियेपर्यंतच्या सर्व समस्या होतील दूर, या आसनांचा करा सराव

हेल्मेट घालताना हे लक्षात ठेवा

डॉ. सरीन यांनी सांगितलं की, तुम्ही घालत असलेलं हेल्मेट अस्वच्छ नसावं. तुम्हाला वारंवार घाम येत असेल तर हेल्मेटमधील घाम जमा होऊ शकतो. असं हेल्मेट घातल्याने केसांमध्ये कोंडा होऊ शकतो. कोंड्याची समस्या वाढली तर केस गळतीचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुमचे हेल्मेट स्वच्छ ठेवणे आणि ते नियमितपणे स्वच्छ करणे महत्वाचे आहे. हवं असेल तर तुम्ही हेल्मेट घालण्यापूर्वी तुमच्या डोक्यावर एखाजा स्कार्फ बांधू शकता. त्यामुळे हेल्मेटचा अस्वच्छपणा तुमच्या केसांमध्ये जाणार नाही आणि तुमचे केस चांगले राहतील.

Advertisement

त्या पुढे म्हणाल्या, खूप घट्ट हेल्मेट घातल्याने केसांच्या मुळांवर घर्षण होते, ज्यामुळे घर्षण अलोपेसिया होऊ शकतो. या स्थितीत, केसांचे मूळ वारंवार ओढल्यामुळे केस गळू लागतात. अशावेळी तुम्हाला हेल्मेटमध्ये तुटलेले केस दिसतात. मात्र घाबरून जाऊ नका, तर नेहमी स्वच्छ आणि कोरड्या केसांवर हेल्मेट घाला आणि खूप घट्ट हेल्मेट घालणे टाळा.

Topics mentioned in this article