Belly Fat Loss Tips: रोज घरीच करा 20 मिनिटांचा व्यायाम, Visceral Fat पटकन होईल कमी

Visceral Fat Burning Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 20 मिनिटांचा व्यायाम करा. 

जाहिरात
Read Time: 2 mins
"Health News: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे?"
Canva

Visceral Fat Burning Exercise Routine: अयोग्य जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोट वाढण्यासह शरीराच्या विविध अवयवांवरही चरबी जमा होऊ लागते. शरीराच्या आतील अवयवांच्या आसपास जमा होणाऱ्या फॅट्सला व्हिसरल फॅट्स (Visceral) म्हणतात. या फॅट्समुळे रक्तशर्करा, हृदयरोग आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो. दरम्यान पोटावरील चरबी कमी करणे आव्हानात्मक बाब आहे, पण योग्य पद्धतीनं व्यायाम केल्यास व्हिसरल फॅट्स कमी होण्यास मदत मिळू शकते. छोट्या छोट्या व्यायामांचा रुटीनमध्ये समावेश करणं हृदय आणि स्नायूसाठी फायदेशीर ठरतील. पोटासह शरीराच्या आतील भागातील चरबी कमी करण्यासाठी नियमित 20 मिनिटे व्यायाम करणं सुरू करावे. यामुळे शरीरही सक्रिय राहील आणि आजारांपासूनही शरीराचे संरक्षण होईल.

पहिले 5 मिनिटे- कोर आणि फुफ्फुसांसाठी व्यायाम करा 

सुरुवातीची पाच मिनिटे असा व्यायाम करा ज्यामुळे हळूहळू हृदयाची गती वाढेल आणि पोटाचा भाग व्यायामासाठी तयार होईल. 
- एका ठिकाणी उभे राहून धावण्याचा व्यायाम करावा.  
-  उभे राहून धडाचा भाग ट्विस्ट करा आणि कंबर फिरवा. 
- हळूहळू जम्पिंग जॅक किंवा स्टेप जॅक करा.

5 मिनिटे - कार्डिओ फ्लो 

- 2 मिनिटांसाठी एकाच जागी उभे राहून जॉगिंग करा किंवा जलद गतीने चाला.
- 90 सेकंदांसाठी Lunge व्यायाम करावा. 
- 90 सेकंदांसाठी साइड स्टेप्स आणि आर्म स्विंग्स करून सेट पूर्ण करावा. 

(नक्की वाचा: Benefits Of Eating Almonds: बदाम किती तास पाण्यात भिजत ठेवावे, बदाम खाण्याची योग्य वेळ कोणती?)

पुढील पाच मिनिटे दोन महत्त्वाचे उपाय

- 20 सेकंदांसाठी जलदगतीने स्क्वेट्स व्यायाम करा आणि 20 सेकंद आराम करा.
- 20 सेकंदांसाठी माउंटेन क्लायम्बर्स व्यायाम करा, 20 सेकंद आराम करा. 
- चार सेटमध्ये व्यायाम करा.

Advertisement

(नक्की वाचा: Sleep Quality: चांगल्या झोपेसाठी डाएटमध्ये 1 गोष्ट खाण्यास करा सुरुवात, गाढ आणि चांगली झोप येईल)

पुढील पाच मिनिट कोरसाठी स्ट्रेंथ वर्क करा

- फोरआर्म प्लँक होल्ड करा 30 सेकंदांसाठी यानंतर 15 सेकंदांसाठी आराम करा. 
- 60 सेकंदांसाठी स्लो बायसिकल क्रंचेस करा.
- 60 सेकंदांसाठी स्टँडिंग नी-टू-एल्बो क्रंचेस करा. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)