- बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मौनजारो इंजेक्शन महत्त्वाचे ठरले आहे
- मौनजारो इंजेक्शन शरीरातील GLP-1 आणि GIP हार्मोन्स सक्रिय करून इन्सुलिनचे प्रमाण वाढवते
- या औषधामुळे भूक कमी लागते आणि पचन प्रक्रिया मंदावल्याने वजन कमी होण्यास मदत होते
Weight Loss Treatment: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत्या वजनाची समस्या आता गंभीर बनत आहे. अनेकांचे वजन दिवसें दिवस वाढत जाते. अशा वेळी वजन कसे कमी करावे असा प्रश्न अनेकांसमोर असतो. यावर उपाय म्हणून 'मौनजारो' (Mounjaro) हे इंजेक्शन सध्या चर्चेत आहे. एशियन हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉ. संदीप खर्ब यांनी दिलेल्या माहितीनुसार, या औषधामुळे केवळ वजनच कमी होत नाही, तर मधुमेह (Diabetes) नियंत्रित ठेवण्यासही मोठी मदत होते. या औषधाचे रासायनिक नाव 'टिर्जेपेटाइड' (Tirzepatide) असे आहे. त्यामुळे सर्वच जण या इंजिक्शनची माहिती घेताना दिसत आहेत.
हे इंजेक्शन शरीरात गेल्यानंतर GLP-1 आणि GIP यांसारखे महत्त्वाचे हार्मोन्स सक्रिय करते. हे हार्मोन्स शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढवतात. ज्यामुळे मेंदूला पोट भरल्याचा संदेश मिळतो आणि भूक कमी लागते. तसेच, हे औषध पोटातील अन्नाची पचन प्रक्रिया मंदावते, परिणामी व्यक्तीला बराच वेळ भूक लागत नाही आणि वजनावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. भूक न लागल्याने खाण्यावर नियंत्रण येते. त्याचा आपोआप परिणाम हो वजनावर होतो. असे काही काळ झाल्यास झपाट्याने वाढलेले वजन हे कमी होण्यास मदत होते.
नक्की वाचा - पेरूला हिंदी मध्ये काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहितच नाही
डॉक्टरांच्या मते, केवळ जेवण कमी करणे वजन कमी करण्यासाठी पुरेसे नसते. अनेकजण कमी जेवण्याच्या नादात अशा गोष्टी खातात ज्यात कॅलरीज जास्त असतात. मौनजारो इंजेक्शन या कॅलरी व्यवस्थापनात आणि मेटाबॉलिझम सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्यावा, त्यानंतरच या इंजेक्शनचा वापर करावा. वजन कमी करण्यासाठी लोक अनेकदा चुकीचे डाएट फॉलो करतात. पण योग्य वैद्यकीय सल्ल्यानुसार घेतलेले हे इंजेक्शन शरीरातील ग्लुकोजची पातळी संतुलित ठेवून लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. मात्र, हे औषध घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत अनिवार्य आहे.
नक्की वाचा - रिकाम्या पोटी विड्याचे पान खाल्ल्याने काय होतं? औषधी गुण जाणून व्हाल थक्क
कॅलरीवर नियंत्रण मिळवणे सोपे यामुळे सोपे होते. अनेकदा वजन कमी करताना लोक कमी खातात, पण उच्च कॅलरी असलेले पदार्थ निवडून चूक करतात. मौनजारो इंजेक्शनमुळे व्यक्तीला आपोआपच भूक कमी लागते. हे औषध पचनसंस्थेवर अशा प्रकारे काम करते की, तुम्हाला लवकर भूक लागत नाही. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबीवर नियंत्रण मिळवले जाते. मौनजारो इंजेक्शन घेतल्यावर शरीरात GLP आणि GIP हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स पोटाची हालचाल मंद करतात. यामुळे खाल्लेले अन्न पोटात जास्त वेळ राहते आणि व्यक्तीला वारंवार भूक लागत नाही.