What To Eat By Age : वयानुसार काय आणि किती खायला हवं? नेहमी फिट राहण्यासाठी डॉक्टरांकडून महत्त्वाच्या टिप्स...

What To Eat According To Age: वयाची 30 वर्षे उलटल्यानंतर मेटाबॉलिजम कमी होतो. याचा अर्थ शरीर आधीसारखं अन्न पचवू शकत नाही. याचमुळे जे अन्न आधी ऊर्जा देत होतं, आता चरबीच्या रुपात शरीरात जमा होऊ लागतं

जाहिरात
Read Time: 2 mins

What To Eat According To Age: जसं जसं आपलं वजन वाढतं तसं आपल्या शरीराच्या गरजा बदलतात. जे पदार्थ आपण वयाच्या 20 व्या वर्षी कोणत्याही अडचणीशिवाय खात होतो आणि पचवत होतो, तेच पदार्थ वयाच्या 30 नंतर शरीरात फॅट जमा करू लागतात. बरेच जण ही बाब लक्षात घेत नाहीत आणि वर्षानुवर्षे तोच आहार फॉलो करतात.

ज्यातून पुढे जाऊन कमी वयात हृदय आणि पोटासंबंधित आजार उद्भवतात. हृदयविकारतज्ज्ञ डॉक्टर नरेश त्रेहान यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, वयानुसार आपल्या आहारात बदल करायला हवा. अन्यथा आरोग्यासंबंधित समस्या सुरू होऊ शकतात. कधी आणि किती खाणं आवश्यक आहे, हे जाणून घेऊया. 

वयाच्या 30 पूर्वीचं शरीर...

डॉक्टर सांगतात की, 30 पेक्षा कमी वयात तरुणांचं मेटाबॉलिज्म चांगलं असतं. या वयात खाल्लेलं पचायला फार त्रास होत नाही. मग दूध असो, तूप, पनीर किंवा तेलकट पदार्थ. पचनक्रिया सहन होते. त्यामुळेच वयाच्या 20-25 वयात दोन-दोन प्लेट खाल्लं तरी वजन वाढत नाही. 

वयाच्या 30 नंतर काय होतं? 

वयाची 30 वर्षे उलटल्यानंतर मेटाबॉलिजम कमी होतो. याचा अर्थ शरीर आधीसारखं अन्न पचवू शकत नाही. याचमुळे जे अन्न आधी ऊर्जा देत होतं, आता चरबीच्या रुपात शरीरात जमा होऊ लागतं आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते. 

Advertisement

नक्की वाचा - Lemon and Clove Remedy: लवंग आणि लिंबू एकत्र खाल्ल्यास काय होते? डॉक्टरांनुसार फक्त 3 दिवसांत शरीरात दिसेल मोठा फरक

Advertisement

वयानुसार, आहार कसा असावा?

20 ते 30 वयोगटातील आहार...
भरपूर कॅलरीज असलेला आहार
आहारात दूध, दही, तूप, सुकामेवा इत्यादींचा समावेश
शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी शारीरिक हालचाली जास्त 

30 ते 40 वयोगटातील आहार...

तूप, तेल, चीजचे प्रमाण कमी
अधिक सॅलड, हिरव्या भाज्या, कमी फॅट्सचे दूध, फळांचा आहारात समावेश
साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा.
नियमित व्यायाम करा.

Advertisement

40 ते 50 वयोगटातील आहार...

पचनक्रिया चांगली राहण्यासाठी उच्च फायबरयुक्त आहार 
मीठ आणि साखरेच्या सेवनावर नियंत्रण 
दर 6 महिन्यांनी आरोग्य तपासणी करा.

वयाच्या पन्नाशीनंतर...

हलकं, सूपयुक्त आणि घरचा आहार
मसालेदार, जास्त तेलकट पदार्थ टाळा
प्रथिनं आणि कॅल्शियमचं सेवन वाढवा (डाळी, दूध, पनीर नियंत्रणात)

डॉक्टरांचा सल्ला का आहे आवश्यक?

डॉक्टर त्रेहान सांगतात की, वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल होतात. हार्मोन्स बदलतात. याशिवाय मसल्स कमकुवत होतात. पचन क्षमता कमी होते. अशात जर तुम्ही आपला आहार आणि लाइफस्टाइलमध्ये बदल केला नाही तर स्थूलता, उच्च रक्तदाब, कॉलेस्टेरॉलसारख्या आजारांचा धोका वाढतो. 

प्रत्येक वयात एकसारखा आहार आणि त्याचं सारखंच प्रमाण त्रासदायक ठरू शकतं. यासाठी वयानुसार आहार नियंत्रित करावा.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)