Chikoo Meaning In English : चिकू एक स्वादिष्ट फळ आहे. या फळात गोडवा आणि पौष्टिक गुण असल्याने चिकू सर्वांचच आवडतं फळ बनलं आहे. पण चिकूला इंग्रजीत काय म्हणतात? हे अनेकांना माहितच नाही.चिकूला इंग्रजीत Sapodilla (सपोडीला) असं म्हणतात.तसच अनेक देशांमध्ये चिकूला Sapota नावानेही ओळखलं जातं.चिकूचं वैज्ञानिक नाव Manilkara zapota आहे. हे फळ सामान्यत: मध्य अमेरिका आणि मेक्सिको भागातील मानलं जातं.पण भारतात चिकूची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.
भारतात चिकूची सर्वात जास्त शेती कुठे?
भारतात चिकूची शेती मुख्यत: महाराष्ट्र,गुजरात, कर्नाटक,तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश सारख्या राज्यात होते. चिकूचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. चिकू खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा वाढते. तसच चिकूत नैसर्गिक साखर (ग्लुकोज, फ्रुक्टोज) असल्याने ते शरीराला तातडीनं ऊर्जा पुरवतात. चिकूचं सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. चिकूत मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने बद्धकोष्ठता कमी होते. चिकूचं सेवन त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं. चिकूत व्हिटॅमीन C आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने त्वचा चमकदार बनते. चिकू खाणं हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. यात पोटॅशियम आणि फायबर असल्याने ते रक्तदाब नियंत्रणात ठेवतं. शरीरातील हाडेही मजबूत होतात.
नक्की वाचा >> Kalyan News : कल्याणच्या 'या' भागात MOMOS विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला, घटनेमागचं कारण पाहून सर्वांना बसला धक्का
अन्य भाषांमध्ये चिकूला काय म्हणतात?
संस्कृत - कन्दुक
कन्नड - सपोटा
बंगाली - सापोता
नेपाली - गुदालू
मराठी -चिकाली
मल्यालम - शिमाई-ऐलुप्पई
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world