जाहिरात

Kalyan News : कल्याणच्या 'या' भागात MOMOS विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला, घटनेमागचं कारण पाहून सर्वांना बसला धक्का

कल्याणमधील काळा तलाव परिसरात कचरा टाकण्याच्या वादातून एका मोमोज स्टॉल चालकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Kalyan News : कल्याणच्या 'या' भागात MOMOS विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला, घटनेमागचं कारण पाहून सर्वांना बसला धक्का
Kalyan Crime News Today

Kalyan Crime News : कल्याणमधील काळा तलाव परिसरात कचरा टाकण्याच्या वादातून एका मोमोज स्टॉल चालकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून महात्मा फुले पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काळा तलाव परिसरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ ओंकार विठ्ठल सुरवसे हे मोमोज विक्रीचा व्यवसाय करतात. मंगळवारी रात्री दुकान बंद करून घरी जात असताना दुसरे स्टॉल चालक मुरलीधर नाडेकर,त्यांचा अल्पवयीन नातू,भावेश नाडेकर आणि हरीश प्रजापती यांनी त्यांना अडवून हल्ला केला, असा आरोप करण्यात आला आहे.

दोन स्टॉलधारकांमध्ये पूर्वीपासून व्यावसायिक स्पर्धा

आरोपींनी धारदार शस्त्राने ओंकार सुरवसे यांच्यावर अनेक वार केले, अशी माहिती आहे. गंभीर जखमी झालेल्या ओंकार यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे."तुमच्या दुकानातील कचरा आमच्या दुकानाजवळ का टाकता?"या कारणावरून वाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.या दोन स्टॉलधारकांमध्ये पूर्वीपासून व्यावसायिक स्पर्धा आणि मतभेद असल्याचाही तपासात विचार केला जात आहे.

नक्की वाचा >> Mumbai Video: 40 रुपयांसाठी Uber चालकाचं महिलेसोबत गैरवर्तन, मुंबईचा व्हिडीओ व्हायरल, कंपनीने उचललं मोठं पाऊल

या घटनेनंतर महात्मा फुले पोलिसांनी तातडीने कारवाई करत 2 आरोपींना अटक केली.त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याबाबतची प्रक्रिया बाल न्याय कायद्यानुसार सुरू करण्यात आली आहे.या प्रकरणाचा अधिक तपास महात्मा फुले पोलीस करत असून हल्ल्यामागील नेमके कारण कचऱ्याचा वाद होता की व्यावसायिक स्पर्धा,याचा शोध घेतला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com